Nashik Crime: १० ते १२ कैद्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, नाशिक कारागृहातील धक्कादायक घटना

Prisoners attacked on Policeman: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारागृहातील कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. 

Nashik jail 10 to 12 prisoners attacked on policeman maharashtra news
Nashik Crime: १० ते १२ कैद्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, नाशिक कारागृहातील धक्कादायक घटना (Nashik Jail, File Photo)  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • नाशिक कारागृहातील धक्कादायक घटना
  • १० ते १२ कैद्यांनी केला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
  • कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यावर कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. १० ते १२ कैद्यांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला (attacked on Policeman) केला आहे. या हल्ल्यात प्रभूचरण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Nashik jail 10 to 12 prisoners attacked on policeman Maharashtra news)

नेमकं काय घडलं कारागृहात? 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल दुपारनंतरही ही घटना आहे. कैद्यांनी लाथा-बुक्क्यांनी आणि दगडाने हल्ला केला असल्याचं पोलीस कर्मचारी प्रभूचरण पाटील यांनी म्हटलं. एका बरॅकमधून दुसऱ्या बरॅकमध्ये जाण्यासाठी आग्रही होते. मात्र, पोलीस कर्मचारी प्रभूचरण पाटील यांनी त्याला विरोध केला. यावेळी संतापलेल्या कैद्यांनी प्रभूचरण पाटील यांच्यावर हल्ला केला.

अधिक वाचा : Mumbai Crime: मसाजसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावलं अन् मग घडलं असं की....

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी प्रभूचरण पाटील हे त्या ठिकाणी एकटेच होते. ही संधी साधून सर्व कैद्यांनी मिळून प्रभूचरण पाटील यांच्यावर हल्ला केला. यानंतर इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या कैद्यांपासून प्रभूचरण पाटील यांची सुटका केली आहे. प्रभूचरण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अधिक वाचा : RTO अधिकाऱ्याच्या घरी धाड; सापडलं मोठं घबाड, उत्पन्नापेक्षा ६५० पटीने आढळली संपत्ती

काल दुपारी घडली आहे मात्र, अद्यापही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्या होत्या. मात्र, असे असतानाही सुरक्षेच्या संदर्भातील ठोस उपाययोजना केली जात नाहीये. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर आला आहे. 

काही दिवसांपूर्वी कल्याणच्या कारागृहातही असाच प्रकार घडला

गेल्यावर्षी कल्याणच्या आधारवाडी काराग-हात दोन कैद्यांनी पोलीस शिपायावर हल्ला केल्याची घटना घडली होती. हल्ला करणारे दोन्ही कैदी हे गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात शिक्षा भोगत होते. ज्यावेळी हे पोलीस कर्मचारी बरॅकची तपासणी करण्यासाठी आले त्यावेळी कैद्यांनी हल्ला केला.

यापूर्वी अशाच प्रकारे कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नागपूर, पुण्यातील कारागृहात सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी