नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता: आता सर्व दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु राहणार; जाणून घ्या कसा असेल अनलॉक

नाशिक
भरत जाधव
Updated Jun 06, 2021 | 12:07 IST

महाराष्ट्र अनलॉकच्या (Maharashtra Unlock) टप्प्यात आला असून आता हळूहळू लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता आणण्यात आली आहे.

Nashik Unlock Now do shopping until 4pm relaxation
नाशिक अनलॉक: संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने राहतील सुरू  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
 • शनिवार-रविवारी दुकाने बंद राहणार
 • सोमवार पासून नवीन नियमावली लागू होणार
 • हॉटेल 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील

नाशिक : महाराष्ट्र अनलॉकच्या (Maharashtra Unlock) टप्प्यात आला असून आता हळूहळू लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता आणण्यात आली आहे. उद्या नाशिक जिल्हा अनलॉक (Nashik District Unlocked) होणार आहे. राज्यात कोरोनाची स्थिती (Coronavirus Situation in Maharashtra) ब-यापैकी आटोक्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातही निर्बंधां (Nashik District Restrictions)मध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. नाशिकचे पालकमंत्री (Guardian Minister of Nashik) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Nashik Unlock Now do shopping until 4pm relaxation)

यानुसार, नाशिकमधील सर्व दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. पण शनिवार-रविवारी मात्र ही दुकाने बंद राहणार असून याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) लवकरच आदेश (Order) काढणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. नाशिकमधील अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने सुरु ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आल्याने दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.

नाशिकमध्ये काय असेल सुरू आणि काय राहणार बंद?

 1. सर्व दुकान,आस्थापना 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
 2. शनिवार, रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचा विचार
 3.  सोमवार पासून नवीन नियमावली लागू होणार
 4. मॉल्स, थेटर्स, नाट्यगृह बंद राहणार
 5. हॉटेल 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील, नंतर पार्सल सेवा सुरू होणार
 6. ओपन गार्डन, जॉगिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू राहणार
 7.  गव्हर्नमेंट ऑफिसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
 8. लग्न 50 लोक, अंत्यविधी 20 लोक, तसेच मीटिंग 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार
 9. बांधकाम 4 वाजे पर्यंत सुरू राहील.
 10. नाशिक जिल्ह्यात रात्री 12 ते दुपारी 5 पर्यंत जमावबंदी लागू असेल, त्यानंतर 5 ते रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू असेल.
 11. लवकरच जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदेश काढणार

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट तसेच ऑक्सीजन बेडची उपलब्ध संख्या विचारात घेण्यात आली. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वेळोवेळी होणारे बदल तसेच मागील वर्षी निर्बंध शिथिल झाल्यानंतर तातडीने वाढलेली रुग्णसंख्या या सर्व बाबींचा सारासार विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लेवल 3 प्रमाणे निर्बंध ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. 

लेवल 3 मधील बाबी जिल्ह्यात कशाप्रकारे लागू करण्यात येतील. याबाबत सविस्तर आदेश यथाशीघ्र पारित करण्यात येतील आणि सोमवार पासून लागू होतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

दरम्यान “जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारातून शस्त्रक्रियेद्वारे बरे झालेल्या परंतु एखादा अवयव कायमस्वरूपी बाधित झालेल्या रुग्णांची सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच तिसऱ्या स्तरातील निर्बंधच्या काळात कामावर जाणाऱ्या कोणालाही त्रास होणार नाही, यासोबतच शहरातील ज्या रस्त्यांवर अवाजवी गर्दी होते त्याठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी नियोजन करावे”, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी