new syllabus for first and second class students in maharashtra : नाशिक : महाराष्ट्रातील शाळांचा पहिली आणि दुसरीच्या वर्गांचा नवा अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच पहिली आणि दुसरीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे; अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शालेय शिक्षणमंत्री नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी पहिली आणि दुसरीसाठी नवा अभ्यासक्रम तयार होत असल्याचे सांगितले.
पालघरमधील ८ ते १२ वी पर्यतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू होणार
पहिली आणि दुसरीचा नवा अभ्यासक्रम तयार झाला तरी तो नव्या शैक्षणिक वर्षापासूनच लागू होईल. २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात असल्यामुळे या शैक्षणिक वर्षात नवा अभ्यासक्रम लागू होणार नाही.
नव्या अभ्यासक्रमात आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डप्रमाणे देशातील थोर व्यक्तींची ओळख करून दिली जाईल.
ग्लोबल टीचर पुरस्काराचे विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना अमेरिका सरकारची फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्यामुळे डिसले यांना परदेशी जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. पण शालेय शिक्षणमंत्र्यांनी डिसले यांना परदेशी जाता येईल, अशी हमी दिली.