इंदुरीकर महाराजांचा ऑड-इव्हन फॉर्म्युला अडचणीत, सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा, विषमला केल्यास मुलगी 

अहमदनगरचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे एक कीर्तन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या कीर्तनात स्त्रीसंग संदर्भात वादग्रस्त वक्तव्य महाराजांनी केल्याने ते सध्या चर्चेत आहेत.

nivrutti maharaj indurikar kirtan about sex and intercourse for boy child and girl child viral
इंदुरीकर महाराजांचा ऑड-इव्हन फॉर्मुल्या अडचणीत, सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा, विषमला केल्यास मुलगी   |  फोटो सौजन्य: Times Now

अहमदनगर :  अहमदनगरचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे एक कीर्तन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या कीर्तनात स्त्रीसंग संदर्भात वादग्रस्त वक्तव्य महाराजांनी केल्याने ते सध्या चर्चेत आहेत. नाशिक जवळच्या ओझर येथे झालेल्या कीर्तनात महाराज यांनी सांगितले की, सम तिथीला स्त्रीसंग केला तर मुलगा होता आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते. या गर्भलिंग निदान संदर्भातील असल्याने आता त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकते.  इंदूरीकर महाराज यांनी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचे मत अहमदनगर येथील PCPNDT समितीच्या सदस्यांनी केला आहे. 

या कायद्यानुसार अमुकतमुक केल्यास मुलगा होतो आणि अमुकतमुक केल्यास मुलगी होते, अशी जाहिरात करणे, गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास १ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात येते. 

यानुसार PCPNDT च्या सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदूरीकर यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. इंदूरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खुलासा मागितला आहे. नोटीस बजावल्यानंतर जर पुरावे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही PCPNDT च्या सदस्यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी असेच वक्तव्य इंदूरीकर महाराजांनी केले होते. पाहा व्हिडिओ 

 

 

निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी त्यांच्या कीर्तनातून अनेकदा सामाजिक, राजकीय क्षेत्रांमधील ज्वलंत विषयावर कीर्तन करुन अनेकांची मनं जिंकली आहेत. मात्र आता गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केल्या प्रकरणी इंदूरीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. आता इंदूरीकर महाराजांनी अशा प्रकारचे विधान करणे योग्य होते का अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी