Train derailed : नाशिकमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; पवन एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरल्याने या रेल्वे वाहतुकीवर परिणाम

नाशिक
भरत जाधव
Updated Apr 03, 2022 | 21:07 IST

नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) लहवीत ते देवळाली दरम्यान एलटीटी-जयनगर (पवन) एक्सप्रेसला अपघात (LTT Jaynagar express train derailed) झाला आहे. पवन एक्सप्रेसचे (Pawan Express) चार डबे रुळावरुन घसरले असून या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

railway accident in Nashik(file Photo)
पवन एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले, अनेक प्रवासी जखमी (file Photo)  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • अपघात नेमका कसा झाला आणि अपघाताचं नेमकं कारण काय? याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही.
  • दुपारी 3.10 वाजण्याच्या सुमारास 11061 एलटीटी-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरुन घसरले
  • अपघातानंतर मध्यरेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) लहवीत ते देवळाली दरम्यान एलटीटी-जयनगर (पवन) एक्सप्रेसला अपघात (LTT Jaynagar express train derailed) झाला आहे. पवन एक्सप्रेसचे (Pawan Express) चार डबे रुळावरुन घसरले असून या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या हलवीत स्थानकाजवळ (Halvi Station) ही दुर्घटना घडली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11.30 वाजता 11061 LTT-जयनगर एक्स्प्रेस सुटली. दुपारी तीनच्या दरम्यान ही एक्स्प्रेस नाशिकजवळील देवलाली येथे आली असता Dn मार्गावर अचानक रुळावरून दहा डब्बे घसरले. या अपघातामुळे अनेक एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक हे विस्कळीत झालं आहे. काही गाड्यांचं मार्ग वळवण्यात आला आहे. तर सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

मार्ग वळवण्यात आलेल्या गाड्या

सीएसएमटी - निजामुद्दीन राजधानी  एक्सप्रेस  - वसई रोड जळगाव भुसावळ मार्गे वळवण्यास आली आहे 
सीएसएमटी हावडा दुरान्तो एक्सप्रेस - वसई रोड जळगाव भुसावळ मार्गे वळवण्यास आली आहे 
एलटीटी प्रतापगड उद्योगनगरी एक्सप्रेस - लोणावळा पुणे दौड मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वेचे डबे रुळावरुन खाली घसरल्याने रेल्वेतील प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या वेगाने मदत आणि बचावकार्य सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नेमका कसा झाला आणि अपघाताचं नेमकं कारण काय? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर मिळालेली नाही. मात्र, रुळ तुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. भुसावळ रेल्वे मंडळ अधिकारी नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत.

या अपघाताच्या संदर्भात मध्य रेल्वेने ट्विट करुन माहिती दिली की, दुपारी 3.10 वाजण्याच्या सुमारास 11061 एलटीटी-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरुन घसरले आहेत. हलवीत ते देवळाली (नाशिकजवळ) दरम्यान डाऊन मार्गावर हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अपघात निवारण गाडी आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातानंतर मध्यरेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

सीएसएमटी स्टेशनच्या टीसी कार्यालय - 55993 आणि एमटीएनएल 02222694040  हे हेल्पलाईन नंबर रेल्वेकडून जारी करण्यात आले आहेत. या रेल्वे अपघातानंतर काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेन्सचा मार्ग बदलण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती मध्यरेल्वेकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी