ED सरकारला इंजिनची गोडी ; राज ठाकरे आणि भाजपची युती होण्याची दाट शक्यता? बावनकुळेंची खुली ऑफर

नाशिक
भरत जाधव
Updated Feb 11, 2023 | 23:13 IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील  ( Politics) एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी उघडपणे मनसे अधयक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भाजपसोबत येण्याची खुली साद घातली आहे.

Raj Thackeray and BJP alliance likely?; Bawankule open offer to raj Thackeray
पुन्हा एकदा भाजप मनसे युतीच्या चर्चेला सुरुवात   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंना वाटेल तेव्हा ते भाजपसोबत युती करू शकतात
  • राज ठाकरे आणि भाजप नेत्याचं गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे.
  • राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातील  ( Politics) एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी उघडपणे मनसे अधयक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भाजपसोबत येण्याची खुली साद घातली आहे.  (Raj Thackeray and BJP alliance likely?; Bawankule open offer to raj Thackeray)

अधिक वाचा  : डार्क चॉकलेट खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केले आहे. राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचं ते म्हणालेत. याशिवाय राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. राज ठाकरेंना वाटेल तेव्हा ते भाजपसोबत युती करू शकतात, असंही बावनकुळे म्हणालेत. “वैचारिक मनोमिलनासाठी आम्ही कुठेही चर्चा केलेली नाही. राज ठाकरे आमचे एक चांगले आणि दिलदार मित्र आहेत. ते खुल्या मनाने आणि खुल्या विचाराने बोलणारे व्यक्तीमत्व आहेत”,असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

अधिक वाचा  : तुमच्या या सवयी तुमच्या मुलांना बिघडू शकतात

मनात एक ठेवायचं आणि बोलायचं वेगळं असे राज ठाकरे नाहीत. कपट कारस्थान करणारे राज ठाकरे नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यावर आमचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांच्या मनात भाजपसोबत यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नेहमी दरवाजे खुले आहेत, असं बावनकुळे म्हणाले आहेत. 

राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढली

राज ठाकरे आणि भाजप नेत्याचं गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली असल्याचे हे सर्वश्रूत आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. तसेच भाजप नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचीदेखील भेट झाल्याचे समोर आलं होतं. मध्यंतरी भाजप नेते नारायण राणे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले होते. तसेच नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक वाढणे, तसेच भाजपने ठाकरेंना युतीसाठी खुली ऑफर देणं या घटना आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत.  

अधिक वाचा  : Daily Horoscope : कर्क राशीसह या 4 राशींसाठी आहेत धन लाभाचे योग

राज ठाकरेंच्या डोळ्यात आहे ठाणे 

अशात राज ठाकरे यांच्या मनसेनेही आपला मोर्चा ठाण्याकडे वळवला आहे. मनसेचा वर्धापन यंदा ठाण्यात होणार आहे. "संघर्षाची तयारी, पुन्हा एकदा भरारी, अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियातून व्हायरल करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंड केल्यापासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढली आहे.

मनसेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन ठाण्यात घेणार आहे. मनसेच्या या खेळीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात मिळणार आणखी बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी