Raj Thackeray: पराभव जिव्हारी लागला, तरीही नाशिकवर प्रेमः राज ठाकरे

नाशिक
पूजा विचारे
Updated Oct 16, 2019 | 21:14 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे सध्या राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. सभेत त्यांनी नाशिकमधला पराभव जिव्हारी लागल्याचं म्हटलं आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray: पराभव जिव्हारी लागला, तरीही नाशिकवर प्रेमः राज ठाकरे 

थोडं पण कामाचं

 • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये प्रचारसभा पडली.
 • यापुढे संधी मिळाली तर मी पुन्हा तुम्हांला या पेक्षा चांगले काम करून दाखवेन- राज ठाकरे
 • ३७० कलम रद्द केल्यावर किती काश्मीरी पंडीत काश्मीरात गेले याचा आकडा द्या- राज ठाकरे

नाशिकः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी इतके काम करून नाशिकमध्ये जो पराभव झाला तो माझ्या जिव्हारी लागल्याचं म्हटलंय.तसंच या शहरात मी मनापासून काम केलं. माझ्या सहकाऱ्यांनी मनापासून काम केलं, असं देखील राज ठाकरे म्हणालेत. नाशिक स्मार्ट सिटीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, नाशिकचा स्मार्ट रस्ता म्हणून २ वर्षांपासून खोदून ठेवला आहे. नाशिकमध्ये जे काम केले ते करायला पाहिजे होतं की नव्हतं, मला कधी कधी प्रश्न पडतो. अशी माणसं तुम्हांला पाहिजे, तर कशाला हव्या या निवडणुका. 

 

राज ठाकरे यांची सभा लाईव्हः 

 1. आजपर्यंत जी सत्ता दिली ती दिली, पण आज तुमच्यासमोर आलो आहे विरोधी.
 2. रेल्वेच्या आंदोलनानंतर मराठी मुलांना परीक्षा देण्याची सुविधा. जो काम करतो, त्याला बाजुला ठेवाहेत.
 3. मोबाईलमध्ये सुरूवातील मराठी भाषा ऐकू येते ते मनसेच्या आंदोलनाचे यश आहे.
 4. सत्तेच्या मागे अनेक डोंगळे जातात त्या गुळामागे, पण जो त्रास तुम्ही भोगताहेत. तो तुमचा राग व्यक्त करण्यासाठी विधानसभेत प्रतिनिधी पाठवायला हवा.
 5. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर बंद करणार आहे. ज्यावेळी सरकारला प्रश्न विचारतील त्यानंतरच मी पत्रकारांना उत्तरं देईल.
 6. पण आज काल दिसताहेत काही जणं तशी.. तुम्हांला कोण दिसलं मला नाही माहिती.  जॅकेट... टरबूज... (मुख्यमंत्र्यांवर टीका)
 7. पुरूष गरोदर राहणार नाही, यापेक्षा अजून या जगात अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. 
 8. ३२ वर्षांचा कवळा मुलगा भाजपचं टीशर्ट घालून मेला, आणि आम्ही निवडणुकीची धमाल करतो. तुम्हांला अशीच लोक पाहिजे असतील तर घ्या अंगावर
 9. आत्महत्या करायची तर ज्याच्या मुळे मरताहेत त्याला मारून तर मरा असं मी वैजापूरमध्ये सांगितले.
 10. १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आम्हांला मनंच उरलेली नाही. बाजुचा मेला तो मेला- राज ठाकरे
 11. आज आम्ही माणसं उभं करू शकत नाही, शेतकऱ्यांना उभे करू शकत नाही.
 12. पुण्यात एका रस्त्याला नाव शिवाजी महाराजांचे आहे, ज्याच्यामुळे आपलं असित्व आहे. त्यांची नावे रस्त्याला काय देता. विमानतळाला दिलं तर मी समजू शकतो.
 13. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे स्मारकाबाबत मी सरकार कल्पना दिली. या ठिकाणी जगातील सर्वात मोठं वाचनालय करा ही कल्पना दिली होती. बाबा साहेबांनी सांगितले होते, वाचा आणि लढा- राज ठाकरे
 14. अरबी समुद्रात शिवाजींचा पुतळा उभारणार अशी टूम काँग्रेस काढली. ती भाजपने पुढे री ओढली. कुठे गेले ते स्मारक, कुठे वाहिलेली फुले
 15. शहर सुधार हे माझे पॅशन आहे. कसे सुधारणा व्हायला हवे, याच्या माझ्या काही कल्पना आहेत.
 16. या शहरावर बोझा नको, म्हणून बाहेरच्या लोकांना मी आणले नाशिक शहरात
 17. यापुढे संधी मिळाली तर मी पुन्हा तुम्हांला या पेक्षा चांगले काम करून दाखवेन- राज ठाकरे
 18. नाशिकबाबत झालेल्या पराभवानंतर माझ्या लोकांना तुम्ही दूर केले पण नाशिकबाबत माझे प्रेम कमी झालेले नाही.
 19. नाशिकचा स्मार्ट रस्ता म्हणून २ वर्षांपासून खोदून ठेवला आहे. नाशिकमध्ये जे काम केले ते करायला पाहिजे होते की नव्हतं, मला कधी कधी प्रश्न पडतो. अशी माणसं तुम्हांला पाहिजे, तर कशाला हव्या  या निवडणुका- राज ठाकरे
 20. कोण तुमच्यासाठी काम करेल, ज्या केलेल्या कामांपासून समाधान नसेल, जो आता कारभार सुरू आहे, नाशिक शहर ओरबाडण्याचा काम सुरू आहे, ते तुम्हांला मान्य आहे.
 21. इतके काम करून जो पराभव झाला तो माझ्या जिव्हारी लागला. या शहरात मी मनापासून काम केले. माझ्या सहकाऱ्यांनी मनापासून केले- राज ठाकरे
 22. महाराष्ट्रातील सहकारी बँका बंद होतात. पीएमसी बँकेतून लोकांना पैसे काढता येत नाही. गेल्या तीन दिवसात पीएमसी बँकेचे तीन ठेवीदारांचा मृत्यू झाला.
 23. ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला त्या अभिजित बॅनर्जींनी सांगितले की भारताची आर्थिक परिस्थिती खराब आहे.
 24. मला फक्त ५० दिवस द्या मी देश सुधारून दाखवतो, पण किती वर्ष झालीत.
 25. या देशातील उद्योग बंद होतील लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील हे मी सांगितले होते.
 26. नोटबंदी झाल्यावर पहिल्या दहा दिवसात माझे भाषण आहे. त्या पहिल्या भाषणात मी म्हटलं होतं, हा निर्णय चुकला तर देश खड्ड्यात जाईल, हे मी सांगितले होते.
 27. अनेक तरूण माझ्या समोर बसले आहेत. असलेल्या नोकऱ्या जाताहेत तुम्हांला नोकऱ्या कोण देणार
 28. पाच लाख उद्योग बंद झाल्यावर किती लोकांच्या नोकऱ्या झाल्या असतील याचा विचार करा.
 29. महाराष्ट्रात ५ लाख उद्योग बंद झाले गेल्या पाच वर्षात. मी नाही सांगत नाही, केंद्र सरकार सांगत आहे.
 30. महाराष्ट्राची सर्व शहर बकाल झाली आहे, त्यांची वाट लावली आहे. त्याबद्दल काही बोलत नाही.
 31. ३७० कलम रद्द केल्यावर किती काश्मीरी पंडीत काश्मीरात गेले याचा आकडा द्या.
 32. काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केले अभिनंदन, पण त्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबध काय
 33. या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कामं केले ते बाजूला पण भलत्याच गोष्टीकडे लक्ष वळवताहेत.
 34. आजपर्यंत युती सडली, पण नाशिकमध्ये एक सीट दिली नाही. पण चालले आपले घरंगळत, मला कळत नाही माणसं आहे का गोट्या...
 35. भाषण आठवतं का, भाषण आठवण्यासाठी सारखंही नव्हते. पण त्याची एक क्लिप फिरत होती.
 36. शिवसेना भाजप ताटवाट्या घेऊन फिरताहेत. आम्ही काय तर १० रुपयात जेवण देणार तर दुसरा म्हणतो आम्ही पाच रुपयात. जसे महाराष्ट्र भीकेला लागला आहे.
 37. स्वागत मला मान्य आहे. पण लोकांना अडवणूक करून स्वागत करायची नाहीत
 38. राफेल सारखी विमाने यातहेत, ही कंपनी बंद करण्याच घाट आहे.
 39. एचएएल सारखी कंपनी कोणाच्या तरी घशात घालण्याचे घाट घातला आहे.
 40. आधीचे सरकार वेडीवाकडे वागताहेत आपण थंड, त्यानंतर दुसरे सरकार आले, तेही वेडीवाकडं वागले ते आपअ सहन करतो आणि आपण थंड बसतो.
 41. सळसळत्या रक्ताची तरूण मंडळी कुठे गेली असा प्रश्न सह्याद्रीला पडला असेल.
 42. पण तसा महाराष्ट्र मला दिसत नाही. ज्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडा फडकवला तो शांत बसला आहे.
 43. आज मी ज्या ताण कण्याने उभा आहे, तसा महाराष्ट मला बघायचा आहे, असं सह्याद्री म्हणत असेल.
 44. आज वैजापूरला जात असताना विशाल बाहू पसरून उभा असलेला सह्याद्री पाहून उर भरून येते
 45. हेलिकॉप्टरमधून उतरलो तर समजत नाही कुठे उतरलो.
 46. नाशिक, पुणे, ठाणे आणि महाराष्ट्रातील काही भाग जिवंत वर्ग असतो. आता मला कळाले तुम्ही जिवंत आहात, आता जरा शांत बसा. निवडणुकीच्या काळात हेलिकॉप्टर या गोष्टी टाळतो.
 47. पण इथे आल्यावर तुमचे दर्शन झाल्यावर अंगामध्ये एक स्पिरिट येते
 48. रोज रोज बोलायला कंटाळा येतो. एकदा भाषण असेल तर मजा येते
 49. राज ठाकरे सभास्थळी दाखल
 50. थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या सभेला होणार सुरूवात 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी