Scholarship application : महत्त्वाची बातमी| जानेवारी महिना संपेपर्यंत भरा शिष्यवृत्ती अर्ज; कसा कराल अर्ज…?

नाशिक
भरत जाधव
Updated Jan 03, 2022 | 09:40 IST

Scholarship Application : विद्यार्थ्यांसाठी (Students) एक अतिशय महत्त्वाची बातमी. भारत सरकार शिष्यवृत्ती (Government Scholarships), शिक्षण शुल्क (tuition fee) व परीक्षा शुल्क (examination fee) आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (Rajarshi Shahu Maharaj Gunvatta Scholarship) योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना 31 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

Scholarship application
Scholarship : शिष्यवृत्ती अर्जासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने महाडिबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) अर्ज करावा.
  • शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2020-2021 या वर्षासाठी पुन्हा अर्ज व 2021-2022 या वर्षाकरिता नवीन अर्ज सादर करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून प्रक्रिया सुरू
  • आधार संलग्नित युजर आयडी आधीच तयार केला असेल तर परत तयार करू नये.

Scholarship Application :  नाशिकः विद्यार्थ्यांसाठी (Students) एक अतिशय महत्त्वाची बातमी. भारत सरकार शिष्यवृत्ती (Government Scholarships), शिक्षण शुल्क (tuition fee) व परीक्षा शुल्क (examination fee) आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (Rajarshi Shahu Maharaj Gunvatta Scholarship) योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना 31 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे (Assistant Commissioner Sundar Singh Vasave) यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन (Online) पद्धतीने महाडिबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) अर्ज (Application)  सादर करा, असे आवाहनही वसावे यांनी केले आहे.

14 डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2020-2021 या वर्षासाठी पुन्हा अर्ज व 2021-2022 या वर्षाकरिता नवीन अर्ज सादर करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयामधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून वेळेत सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

अर्ज करताना घ्या काळजी 

ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करून अर्ज भरलेला असेल त्यांनी नवीन नॉन आधार यूजर आयडी तयार करू नये. तसेच नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नूतनीकरण केल्यास व एका पेक्षा जास्त यूजर आयडी तयार केल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल, असेही सहाय्यक आयुक्तांकडून कळवण्यात आले आहे.

नव्याने कसा कराल अर्ज 

MahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
 पोर्टलवर लॉग इन व्हा.
तुमचे प्रोफाइल तयार करा.
ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.

– सुंदरसिंग वसावे, सहाय्यक आयुक्त, माहिती विभाग
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी