Kishori Pednekar : बाळासाहेबांचं सूप काढणारे त्यांच्या नावाने जोगवा मागत आहेत, किशोरी पेडणकर यांची टीका

जेव्हा बाळासाहेब हयात होते तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांना आत्मक्लेश दिला, शिवसेना भवनावर दगडफेक केली, ते गेल्यानंतर यांनी बाळासाहेबांचे मटण आणि सूप काढले आता हेच लोक बाळासाहेबांच्या नावाने जोगवा मागत आहेत अशी टीका शिवसेना नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. तसेच सख्खा भाऊ मुख्यमंत्री झालेला राज ठाकरे यांना पहावत नाही असेही पेडणेकर म्हणाल्या.

kishori pednekar
किशोरी पेडणकर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जेव्हा बाळासाहेब हयात होते तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांना आत्मक्लेश दिला.
  • बाळासाहेबांचे मटण आणि सूप काढले आता हेच लोक बाळासाहेबांच्या नावाने जोगवा मागत आहेत
  • सख्खा भाऊ मुख्यमंत्री झालेला राज ठाकरे यांना पहावत नाही असेही पेडणेकर म्हणाल्या.

Kishori Pednekar : नाशिक : जेव्हा बाळासाहेब हयात होते तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांना आत्मक्लेश दिला, शिवसेना भवनावर दगडफेक केली, ते गेल्यानंतर यांनी बाळासाहेबांचे मटण आणि सूप काढले आता हेच लोक बाळासाहेबांच्या नावाने जोगवा मागत आहेत अशी टीका शिवसेना नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. तसेच सख्खा भाऊ मुख्यमंत्री झालेला राज ठाकरे यांना पहावत नाही असेही पेडणेकर म्हणाल्या. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

मशिंदीवरील भोंगे उतरवले पाहिजे अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत अल्टिमेट दिला होता. अखेर ४ तारखेपासून अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावली. अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांना अटक करण्यात आले असून काही ठिकाणी ताब्यातही घेतले आहे. यावर मुंबईच्या महापौर म्हणाल्या की आजही राज ठाकरे यांचे राजकारण बाळासाहेंब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. जेव्हा बाळासाहेब हयात होते तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांना त्रास दिला. शिवसेना भवनवर दगडफेक केली, बाळासाहेब हयात असताना राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. आजही बाळासाहेबांचे नाव घेऊन त्यांना जोगवा मागावा लागतो असे पेडणेकर म्हणाल्या. 

बाळासाहेब गेल्यानंतर याच राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे चिकन सूप आणि मटण काढलं होते. राज ठाकरे यांना आपला भाऊ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेला हे पहावत नाही, उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा असे बाळासाहेबांचे स्वप्न होते, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण केले. राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडिलही हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे असेही पेडणेकर म्हणाल्या.   

 

राज ठाकरेंनी मानले मौलवींचे आभार

मुंबईत १४४० मशिदी आहेत. यापैकी १३५ मशिदींवर पहाटे पाचच्या आधीच अजान झाली. या १३५ मशिदींवर पोलीस कारवाई व्हायला हवी, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ते मुंबईत शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आधी राज ठाकरे संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेणार होते. पण काही मुद्दे तातडीने जाहीर करण्यासाठी संध्याकाळी ठरलेली पत्रकार परिषद अचानक दुपारी घेण्याचा निर्णय राज ठाकरे  यांनी घेतला आणि शिवतीर्थ येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पहाटे पाचच्याआधी अजान न करणाऱ्या मशिदींच्या मौलवींचे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जाहीर आभार मानले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी