Gas Leakage| इगतपुरीत गॅसच्या भडक्याने 6 जण होरपळले, दोन जण गंभीर

नाशिक
भरत जाधव
Updated Jan 10, 2022 | 18:22 IST

गॅस लिकेज (Gas Leakage) होऊन उडालेल्या भडक्यातील दोन घटनांमध्ये नाशिक (Nashik ) जिल्ह्यात 6 जण भाजले आहेत. यातील पहिली घटना ही इगतपुरी (Igatpuri) येथे घडली, येथील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

six people were burnt and two others injured in a gas explosion in Igatpuri
इगतपुरीत गॅसच्या भडक्याने 6 जण होरपळले  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • गॅस भडक्याची दुसरी घटना नाशिकच्या पेठ तालुक्यातील जांभुळपाडा येथे घडली.
  • गिझरचा गॅस लिक झाल्याने भडका उडाला.

नाशिकः गॅस लिकेज (Gas Leakage) होऊन उडालेल्या भडक्यातील दोन घटनांमध्ये नाशिक (Nashik ) जिल्ह्यात 6 जण भाजले आहेत. यातील पहिली घटना ही इगतपुरी (Igatpuri) येथे घडली, येथील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तर दुसरी घटना म्हसगण (Mhasgan) शेजारील जांभुळपाडा येथे घटली आहे. या घटनेमध्ये चार जण भाजले आहेत.

इगतपुरी येथे मुनाफ शेख यांच्या घरी गॅस गिझर लावण्यात आला मात्र, गिझरचा गॅस लिक झाला. घरातील मंडळींनी नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी पाणी गरम करायला गॅस गिझर सुरू केला. मात्र, त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. या घटनेत मुनाफ शेख भाजले गेले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा त्या दिशेने धावला. त्यामुळे तोही भाजला. मात्र, त्याने प्रसंगावधान राखत दरवाजा बंद केला. मात्र, गॅसचा भपका आणि जोर इतका होता की त्यामुळे बाथरूमच्या काचा फुटून बाहेर पडल्या. दरवाजाही तुटला.

यातील जखमी मुलावर इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुनाफ शेख हे जास्त भाजल्याने त्यांच्यावर नाशिक येथील नारायणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

गॅस भडक्याची दुसरी घटना नाशिकच्या पेठ तालुक्यातील जांभुळपाडा येथे घडली. या घटनेमध्ये चार जण भाजले आहेत. जांभुळपाडा येथे गॅस जोडणीची तपासणी करण्यासाठी कारागीर आले होते. त्यांनी गॅस व्हॉल्वमधून गॅसची गळती होते की नाही, हे तपासण्यासाठी काडी पेटवली. त्यामुळे गॅसने पेट झाला. त्यात घरातील चार व्यक्ती भाजल्या गेल्या. त्यांच्यावर सध्या पेठ येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी