ओवैसींच्या आमदाराची गुंडगिरी, समर्थकांसोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण

नाशिक
पूजा विचारे
Updated Mar 26, 2020 | 14:23 IST

देश सध्या कोरोना व्हायरससारख्या साथीच्या आजाराने त्रस्त आहे आणि डॉक्टर रात्रंदिवस रुग्णांवर उपचार करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, पण असेही काही लोकं आहेत की, त्यांच्या वाईट कृती करण्यापासून थांबत नाहीत.

AIMIM MLA Mufti Mohammad Ismail abused
MIM च्या आमदाराची दादागिरी, डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण  |  फोटो सौजन्य: ANI

नाशिकः कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे आणि अशातच डॉक्टर, नर्स, पोलीस, अहोरात्र काम करताना दिसत आहेत. डॉक्टर आणि नर्स रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र काही लोकं असेही आहेत की, ते आपलं वाईट कृत्य करण्यापासून थांबत नाहीत. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. राज्यात 144 कलम लागू झालं आहे, त्यासोबत लॉकडाऊन सुद्धा आहे. मालेगावमध्ये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना शिवीगाळ केली आहे. 

रुग्णालयात घातलेला गोंधळ एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांना भोवण्याची चिन्हं आहेत. आमदारांसह त्यांच्या 10 समर्थकांवर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.

डॉक्टरांसोबत असभ्य वर्तन 

कर्फ्यू असूनही आमदार आपल्या समर्थकांसह हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि यावेळी डॉक्टरांशी धक्काबुक्की करण्याशिवाय त्यांनी शिवीगाळही केली. आमदार मुफ्ती इस्माईल यांनी काल रात्री आमदार मुफ्ती यांच्या समक्ष त्यांच्या समर्थकांनी सामान्य रुग्णायलातील वैद्यकीय अधीक्षकांसह इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली होती. 

यानंतर डॉक्टरांचे कर्मचारी संतापले आणि त्यांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर आता आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आता आमदार यांना अटक करण्यात आली. आमदारानं आरोप केला आहे की, डॉक्टर दोन रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देत नाही आहेत आणि त्यांना जाणूनबुजून हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी