महाराष्ट्राला हादरवून सोडणारं 25 वर्षापूर्वीचं मालेगावातील सर्वात मोठं पाटील हत्याकांड; त्या काळ्या रात्री पाटलांचं 6 जणांचं कुटुंब पडलं होतं रक्ताच्या थारोळ्यात

नाशिक
भरत जाधव
Updated Oct 27, 2021 | 00:03 IST

Patil massacre in Malegaon 25 years ago : नाशिकच्या(Nashik District) मालेगाव (Malegaon Taluka )तालुक्यात 25ऑक्टोबर 1996 साली हे हत्याकांड घडलं. जमिनीच्या वादातून (Land Dispute) दोन भावातील (Brothers)वाढत्या वैमनस्याने(Animosity) एका भावाने दुसऱ्या भावाच्या कुंटुबातील सर्व सदस्यांचा खून केला.

The biggest Patil massacre in Malegaon 25 years ago
25 वर्षापूर्वीचं मालेगावातील सर्वात मोठं पाटील हत्याकांड  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मालेगाव (Malegaon Taluka )तालुक्यातील 25 ऑक्टोबर 1996 सालंचं हत्याकांड
  • एका भावाने दुसऱ्या भावाच्या कुंटुबातील सर्व सदस्यांचा खून केला
  • पंचवीस वर्षापूर्वी घडलेल्या या हत्याकांडाला पाटील हत्याकांड (Patil massacre) नावाने शहरात ओळखलं जातं.
नाशिक : Patil massacre in Malegaon 25 years ago : दिल्लीतील बुराडी येथील 11 जणांच्या आत्महत्येच्या घटनेने सर्व देश हदरुन गेला. पंचवीस वर्षापूर्वी महाराष्ट्रातील अशाच एका सामूहिक हत्याकांडामुळे सर्व राज्य हादरवून गेलं होतं. नाशिकच्या(Nashik District) मालेगाव (Malegaon Taluka )तालुक्यात 25ऑक्टोबर 1996 साली हे हत्याकांड घडलं. जमिनीच्या वादातून (Land Dispute) दोन भावातील (Brothers)वाढत्या वैमनस्याने(Animosity) एका भावाने दुसऱ्या भावाच्या कुंटुबातील सर्व सदस्यांचा खून केला. पंचवीस वर्षापूर्वी घडलेल्या या हत्याकांडाला पाटील हत्याकांड (Patil massacre)नावाने शहरात ओळखलं जातं. या हत्यांमुळे मालेगाव शहरासह संपूर्ण राज्यात 1996 साली मोठी खळबळ माजवली होती. शहरातील नागरीक या हत्येमुळे इतके भयभीत झाले होते की, आजही या घटनेविषयी बोलण्यास घाबरतात. त्या काळ्या रात्रीची आठवण करण्यास येथील ज्येष्ठ नागरीक आजही हिंमत करत नाहीत.

मालेगाव तालुक्यातील सोयगाव ग्रामपंचायतीच्या  हद्दीतील जुन्या सब स्टेशन शेजारच्या शेती वजा फार्म हाऊसमध्ये  कृषी अधिकारी सुपडू धवल पाटील यांची आणि पत्नी पुष्पाताई पाटील, आई केसरबाई, सुपडू पाटील याच्या मुली पूनम आणि बंटीताई पाटील आणि मुलगा राकेश पाटील याची हत्या त्यांचे काका प्रकाश पाटील यांनी केली गोळ्या झाडून हत्या केली.  सुपडू पाटील हे कृषी अधिकारी होते आणि आपल्या शेत जमिनीवर एक नर्सरी चालवत. 

तर प्रकाश पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसह नाशिक येथे राहत होते आणि नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेत वॉटर अॅनालायझर (वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक) म्हणून कार्यरत होते. प्रकाश पाटील यांचा मुलगा संदीप पाटील आणि प्रकाश पाटील हे नाशिकला राहत असायचे. संदीप पाटील हा इंजिनिअरींगसाठी पुण्यातील एमआयटीत शिक्षण घेत होता, तेथील हॉस्टेलमध्ये तो राहत. घटना घडली त्यावेळी संदीप हा फक्त सतरा वर्षाचा होता, इंजिनिअरीग शिक्षणाचं त्याच पहिलं वर्ष होतं. दरम्यान या पोलिसांनी या हत्ये प्रकरणी प्रकाश पाटील आणि त्याचा मुलगा संदीप पाटील यांनी हत्या केल्याचं निदर्शनास आले. परंतु संदीप याने आपल्या जबाबामध्ये आपले वडील प्रकाश पाटील यांनी या हत्या केल्याचं सांगितलं आहे.

जन्मठेपेची शिक्षा झाली कमी

संदीप पाटील यांच्या जबाबामुळे आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारे प्रकाश पाटील यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने प्रकाश पाटील याला फाशीची शिक्षा सुनावली. परंतु या शिक्षेत बदल कमी करण्यात आल्यानंतर त्यांना जन्मठेप झाली. परंतु तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे जन्मठेपेतील शिक्षाही पूर्ण झाली. 

काय होता वाद

स्थानिकांच्या मते, पाटील बंधुमध्ये जमिनीवरुन दोन्ही भावांमध्ये वाद चालू होते. 96 च्या काळात पाटलांकडे खूप जमीन होती. त्याच जमिनीची वाटणीसाठी दोघां भावांमध्ये वाद होते. प्रकाश पाटील सुपडू पाटील यांच्याकडे जमिनीची वाटणीची मागणी करत आपल्या मालकीच्या जमिनीची मागणी नेहमी करायचा. परंतु सुपडू पाटील नेहमी त्यावर नंतर विचार करून, असं सांगत वाटणीसाठी टाळाटाळ करत असायचा.

व्यंकट पगारे यांनी पोलीस तपासात नोंदविलेल्या जबाबानुसार. दोन्ही भावांमध्ये जमिनीच्या वादातून भांडणे होत नेहमी होत असल्याचं सांगितले आहे. भांडणांमध्ये जिवे मारण्याची धमकी देत असतं. या वादाचे रुपांतर गुन्ह्यात झालं. व्यंकट पगारे हे पाटलांच्या बंगल्यापासून सुमारे 50 फुटावरील शेडमध्ये राहत होता. एकदा उन्हाळ्यात व्यंकट पगारे झाडांना पाणी देत होता, तेव्हा प्रकाश पाटील आणि सुपडू पाटील यांच्यातील भांडण ऐकलं. त्यावेळी प्रकाशने सुपडू पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती, आणि ही धमकी दुर्दैवाने खरी झाली.पगारे यांनी घटनेच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 23 ऑक्टोबर 1996 रोजी सांयकाळी संदीप पाटील याला सुपडू पाटील यांच्या घरात घुसताना पाहिलं. त्यावेळी संदीपकडे एक सुटकेस आणि शबमन बॅग होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी आणि रात्री संदीपला आणि पुष्पाताई पाटील, सुपडू पाटील यांच्या पत्नी, केसरबाई, पुनम आणि बंटीताई, राकेश यांनाही पाहिलं. त्यांनी त्यादिवशी जेवण केलं आणि झोपी गेल्याचं पगारे यांनी सांगितले.

घटनेमुळे या परिसराची ओळख सातखुनी बंगला

मालेगावातील या घटनेने नागरिकांच्या मनात इतकी दहशत बसली होती. लोक त्याविषयी अधिक बोलत नसतं. पाटील यांच्या बंगल्यात सहा लोकांची हत्या झाली. सर्व शहरात या घटनेची माहिती आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी एक वेगळी कहाणी आपल्याला ऐकायला मिळते. यामुळे काहींनी कथन केल्याप्रमाणे येथे सात खून झाल्याचा समज लोकांमध्ये आहे. याच माहितीवरुन या परिसराचे नाव, सातखुनी बंगला अशी झाली आहे. पाटील हत्याकांडाला शहरात सात खून बंगला हत्याकांड असं म्हटलं जातं. दरम्यान या घटनेमुळे नागरीक इतके भयभीत झाले होते त्या परिसरात जाणं आणि तेथे प्लॉट घेणं टाळत असतं. आता-आत्ता लोक तेथे आसपास जमीन, घर खरेदी करत आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात या परिसरातील प्लॉटचा दर कमी झाला होता.

25 ऑक्टोबरच्या काळ्या रात्री पगारेंनी संदीप पाटीलला सुपडू पाटीलच्या घरी पाहिलं

पोलिसांनी लिहिलेल्या जबाबानुसार, व्यंकट पगारे हा सुपडू पाटलांचा नोकर होता. तो बंगल्याच्या ५० फुटावरली एका शेडमध्ये राहत होता. 23 ऑक्टोबर 1996 रोजी संदीप पाटील सुपडू पाटील यांच्या घरी आला आणि 25 ऑक्टोबरपर्यंत घटनेपर्यंत तो तेथेच राहिल्याचं पगारे यांनी सांगितले. जबाबानुसार, पगारे यांनी 25 ऑक्टोबरच्या रात्री 2.30 ते 3.00 वाजण्याच्या सुमारास रुपाली(बंटीताई)  'आई ग' ओरडत होती. तर केसरबाई 'शांत हो' म्हणत असल्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला. परंतु सुपडू पाटील यांच्याकडे रानडुक्कर मारण्यासाठी एक बंदुक आहे, तर त्यांनी डुक्करावर गोळी झाडली असेल असे म्हणून पगारे त्या रात्री झोपी गेले.

काळं-बेरं असल्याचं सालदाराला कळलं, मग उघडकीस आला पाटील हत्याकांड

दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुपडू पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये राहणारा सुरेश तेथे आला. दुध काढण्यासाठी तो बादली आणण्यासाठी सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर गेला. त्याला बंगल्याचे दाराला कुलूप लावलेले दिसले. त्यावर एक चिठ्ठी लावलेली दिसली. या चिठ्ठीवर लिहिले होते की,

- "आम्ही सर्व (परगावी) स्टेशनच्या बाहेर जात आहोत.  पुढील कामे काही दिलेली नाहीत. आम्ही रविवारी किंवा सोमवारी परतत आहोत. सर्व कामे थांबवावीत." सुरेशने ही चिठ्ठी पगारे यांना दाखवली. मग काहीतरी विचित्र घडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी पगारे यांनी सुरेशला रात्रीचा किस्सा सांगितला. त्यानंतर रात्री काहीतरी भलताच प्रकार घडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग पगारे यांनी सुभाषला ती चिठ्ठी घेऊन सुपडू पाटलांची बहीण विजू आत्याकडे जायला सांगितले. माहिती मिळताच विजू आत्या हे पती झुंबर पाटील यांच्यासह आले. झुंबर पाटील यांनी सुभाषला अशोक अण्णाला फोन करायला सांगितला. माहिती मिळताच अशोक अण्णा व सुपडू पाटील यांचे चालक तेथे आले.  ते सर्व आल्यानंतर व्यंकट पगारे यांनी त्यांना काय पाहिले याची माहिती दिली. मग ते सर्वांनी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं पाटलांचं कुटुंब

बंगल्याजवळ आल्यानंतर दरवाजे व खिडक्या बंद आहेत. स्वयंपाकघराचा दरवाजा आतून बंद असल्याचे पगारे त्यांना आढळून आले. मग त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा ढकलत थोडासा उघडला. तेथे त्यांना सुपडू पाटील यांच्या व्हॅनच्या चाव्या डायनिंग टेबलवर पडलेल्या आढळल्या. एका ग्रीलमधून बांबू घालून त्या चाव्या घेतल्या आणि त्यानंतर पुष्पाताईंच्या आई-वडिलांच्या खोलीकडे पगारे, झुबर पाटील, सुभाष, अशोक अण्णा हे गेले. त्यानंतर अशोक अण्णा व इतरांनी सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर फेरफटका मारला. त्यांनी बेडरूमच्या खिडकीचा मागील दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. तेव्हा त्याना सुपडू पाटील व पुष्पाताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ही माहिती होताच नोकर व्यंकट पगारे रडू लागला. पोलिसांना माहिती देण्यासाठी अशोक अण्णा स्कूटरवरून निघाले. छावणी पोलीस ठाण्यात फोन करत घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच पोलीस तेथे आले. त्यांना बंगल्यात सहा मृतदेह पडलेले आढळले.

चिठ्ठीमुळे सापडला भावाचा जीव घेणारा हत्यारा 

26.10.96 रोजी पीआय मोरे हे सुपडू पाटील यांच्या बंगल्याची झडती घेत असताना त्यांना सुपडू पाटील यांची काळ्या रंगाची पॅन्ट सापडली ज्यामध्ये सुपडू पाटील यांची मुलगी पूनम हिच्या नावाची चिठ्ठी सापडली होती. ही चिठ्ठी संदीप पाटील यांनी लिहिलेली होती. त्यावर त्यांचा पत्ता लिहिलेला होता.  खोली क्रमांक 120, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल बॉईज हॉस्टेल, पौड रोड, कोथरूड, महागणेश कॉलनी, पुणे-29.

त्यानंतर पीआय मोरे यांनी पीएसआय उगले यांना पुण्याला जाण्यासाठी नियुक्त केले आणि संदीप पाटील यांचे हस्ताक्षर मिळवण्यास सांगितले.  पीएसआय उगले यांनी 27.10.96 रोजी संदीप पाटील याच्या हॉस्टेलच्या खोलीत असलेल्या लाकडी कपाटातून जप्त केली. 28.10.96 रोजी प्रकाश पाटील व संदीप पाटील यांना अटक करण्यात आली.

संदीप पाटीलचा कबुलीनामा- असा घडला हत्याकांड

आपल्या जबाबात संदीप पाटील म्हणाला की,  21 ऑक्टोबर 1996 रोजी  दसऱ्याच्या  दुसऱ्या दिवशी  तो नाशिकला गेला होता. दरम्यान 19 तारखेला त्याचे काका सुपडू पाटील यांनी  त्याला कॉल केला होता. पुण्याहून येत असाल तर सोयगावला येण्यास सांगितलं. मग वडील प्रकाश पाटील यांना त्याने सांगितले की, 23  तारखेला तो सोयगावला जाणार आहे. त्यावेळी प्रकाशने सांगितले की, 24 तारखेला मालेगाव न्यायालयात सुनावणी आहे. प्लॉटसाठी खरेदीदार शोधण्यासाठी सोयगावला येणार आहे. 23 तारखेला संदीप 7.15 वाजेच्या दरम्यान सोयगाव येथील मृत काकाच्या घरी पोहचला.

 24 तारखेला वडील येणार असल्याचं संदीपने काकाला सांगितले. रात्रीचे जेवण झाल्यानंतर टीव्ही पाहत गप्पा करत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी 24 तारखेला सुपडू पाटील यांचा मुलगा  मृत राकेश हा सटाणा येथे हॉकीचा सामना खेळण्यासाठी गेला होता. दुपारी सुपडू पाटील केससाठी हजर राहण्यास न्यायालयात निघून गेले. तेव्हा  मृत पूनम आणि संदीप हा बेडरुममध्ये अभ्यास करत बसले.

काही वेळानंतर पुनम तेथून निघून गेली आणि त्यानंतर पपू राकेश आणि पूनम दोघेही आले. तर सुपडू पाटील अडीच वाजेच्या दरम्यान परत आले. सायंकाळी साडेपाच वाजता पूनम आणि सुपडू पाटील दाभाडीकडे असलेल्या शेताकडे निघून गेल. ते नंतर सात वाजेपर्यंत परतले. त्या दिवशी राकेशचा वाढदिवस असल्याने सुपडू पाटील यांनी पेढे आणले होते. त्यानंतर त्यांनी रात्रीचे जेवण केलं नंतर साडेदहा वाजता पूनम आणि काका सुपडू पाटील एकाच रुममध्ये झोपी गेले. त्यानंतर संदीप राकेशच्या शेजारी गादी टाकून अभ्यास करू लागला. काही वेळानंतर तो विचार करू लागला की वडील(प्रकाश पाटील) येणार होते पण का आले नाहीत? नंतर संदीप पुस्तक ठेवून झोपी गेला.

 रात्री अडीच वाजता संदीपला दार ठोकण्याचा आवाज आला. आवाज कुठून येत आहे हे पाहण्यासाठी संदीप गेला तेव्हा त्याला स्वंयपाक घराच्या खिडकीजवळ संदीप असा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर त्याने दार घडलं तेव्हा प्रकाश पाटीलने संदीपला विचारलं की, सर्वजण झोपी गेले का? संदीपने हो म्हटल्यानंतर त्यांनी आपण स्वत त्यांना उठवणार असल्याचं प्रकाश म्हणाला. त्यानंतर संदीपचा स्वेटर अंगात चढवत प्रकाश पाटील टीव्ही रुम आणि बेडरुमध्ये गेले आणि परत आले. त्यानंतर त्यांनी स्वेटर काढून बेसिनच्या वरती असलेल्या खुंटीवर टांगलेला टी शर्ट अंगात घातला.

त्यानंतर प्रकाश पाटील बेडरुम आणि टीव्ही रुममध्ये गेला.  संदीप पाणी पित असतानाच टीव्ही रुममधून गोळी झाडल्याचा आवाज आला, त्यानंतर लगेच आई गं असा राकेशचा ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर अजून एक गोळी झाडल्याचा आवाज आला त्यानंतर आई असा आवाज आला तो आवाज रुपालीचा होता. त्यावेळी संदीपने चेहऱ्यावर मफलर टाकलेला त्यांच्या वडिलांना पाहिलं. त्यांच्या हातात बंदुक होती. त्यानंतर प्रकाश पाटील बाथरुमकडे पळू लागला. त्यादरम्यान पूनम बेडरुममधून पळत आली. ती घाबरलेली होती, पडद्याजवळ उभा  असलेल्या बबलूला ओळखू शकली नाही. ती त्याला मारू लागली. संदीपने तिला शांत केल्यानंतर तो बबलू असल्याचं सांगितले. 

संदीपने पळण्याचा प्रयत्न केला परंतु स्वंयपाक घराचे दार बंद होते. नंतर त्याला आजी, पूनम आणि काकूचा ओरडण्याचा आवाज आला. फोन करा, गाडी आणा असे आवाज ते देत होते.  मग संदीपने पाहिले की, काका बेडरुममध्ये  जाताना दिसले. नंतर कपाट उघडण्याचा आवाज आला.  त्यावेळी प्रकाश पाटील हा बाथरुमच्या शेजारी उभा होता. मग त्याने एक गोळी झाडली. त्यावेळी काकू आणि पूनम टीव्ही असलेल्याच्या खोलीतून बाहेर आल्या.  तेव्हा त्यांनी प्रकाशला धक्का दिला. त्यावेळ प्रकाशने पूनमवर गोळी झाडली. हे सर्व दृश्य पााहून संदीप घाबरला होता. तो रडू लागला.

त्यादरम्यान संदीपची आजी ही बेडरुममध्ये गेली, मोठ्या रडू लागली. तितक्यात प्रकाश बेडरुममध्ये शिरला आणि त्याने स्वता:च्या आईवर दोन गोळ्यया झाडून ठार मारलं. काकीवर म्हणजेच प्रकाशने त्याच्या वहिणीवरही गोळ्या झाडल्या. संदीप एकटा स्वंयपाक घरात होता. त्यावेळी त्याचे वडील प्रकाश पाटील तेथे आला आणि संदीपला सांगितलं तयार रहा , आपल्याला जायचे आहे.  त्यावेळी प्रकाशने आपला चष्मा काढला, त्याचे डोळ्यात पाणी होतं. सर्वांना ठार केल्यानंतर प्रकाश पाटील आणि संदीप पाटील वापरलेल्या वस्तू नीट ठेवत आणि कपडे नीट करत बाहेर निघू लागले. त्यावेळी त्यांनी समोरील दारावरील चिठ्ठी लिहिली. मळ्यातून पायी चालत- चालत संदीप आणि प्रकाश एकता चौकपर्यंत पोहचले. तेथून त्यांनी ऑटो रिक्षा घेऊन मालेगाव स्टॅण्ड गाठलं. तेथून ते दोघे ट्रक्सी घेवून नाशिकच्या निपाणी बस स्टॅण्डला उतरले. तेथून संदीप आपल्या हॉस्टेलवर गेला होता.

संदीप 25 तारखेला हॉस्टेलला पोहचला तेथे त्याने त्याच्या बॅगेत हत्येसाठी वापरलेले वस्तू पाहिल्या. रक्ताने माखलेला टी-शर्ट,रुमाल, हातमोजे आणि एक पांढरी चप्पल आणि एका पांढऱ्या पिशवीत सहा रिकामी काडतुसे होती. हे वस्तू आपल्या जवळ ठेवणं धोकेदायक असल्याने संदीपने या वस्तू पुण्यातील कर्वे रोडवरील म्हात्रे पुलाखाली फेकण्याचा विचार केला. वस्तू फेकाव्यात की काय करावं असा विचार चालू असतानाच वसतिगृहाच्या कॅटीनमध्ये फोन आल्याचा निरोप संदीपला मिळाला. सुरेशच्या लहान भावाने फोन करुन मालेगावला येण्यास सांगितलं. फोन आल्यानंतर मी माझ्या खोलीत परतलो.

सकाळी मालेगावला जाण्यासाठी कपडे बांधले. त्या वस्तू फेकून आल्यानंतर संदीप रात्री आपल्या 102 क्रमांकाच्या खोलीत झोपला होता. रात्री 2.00 ते 2.30 च्या दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि मला चौकशीसाठी सदर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी P.S.I. उगले  मला घेऊन जाण्यासाठी सकाळी मालेगावहून कोथरूड पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आपला संशयाची सुई त्याच्याकडे आणून त्याने साहित्य कुठे फेकलं हत्येमागे कोण होत याची माहिती मिळवली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी