अन् आज छगन भुजबळ यांनी उगारला पत्रकार परिषदेत बूम

today Chhagan Bhujbal raised the mic in the press conference : अंजनेरीचा हनुमान जनस्थळावरून सभेत महंतांनी गोविदानंद महाराज यांच्यावर माईक उगारल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  महंतांनी गोविदानंद महाराज यांच्यावर उगारलेल्या माईकची नक्कल आज मंत्री छगन भुजबळ यांनी करून दाखवली आहे.

today Chhagan Bhujbal raised the mic in the press conference
अन् आज छगन भुजबळ यांनी उगारला पत्रकार परिषदेत बूम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महंतांनी गोविदानंद महाराज यांच्यावर माईक उगारल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला
  • आज पत्रकार परिषदेत बूम उगारत छगन भूजबळांनी केली महंतांची नक्कल केली
  • सरकारचा पुरावा दाखवून अंजनेरी जन्मस्थळ सिद्ध होत नाही – गोविंदानंद महाराज

नाशिक  : अंजनेरीचा हनुमान जनस्थळावरून सभेत महंतांनी गोविदानंद महाराज यांच्यावर माईक उगारल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  महंतांनी गोविदानंद महाराज यांच्यावर उगारलेल्या माईकची नक्कल आज मंत्री छगन भुजबळ यांनी करून दाखवली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते. यावेळी त्यांना एका पत्रकाराने अंजनेरीच्या वादासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना छगन भुजबळ यांनी यावेळी समोर ठेवलेला बूम उचलून म्हणाले' बार बार कॉन्ट्रोवर्सी कि बात मत करो' . त्यानंतर पुढे जाऊन एका पत्रकाराने पुन्हा अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थळा संदर्भात भुजबळ यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी समोरील बूम उचलून उगारला. म्हणाले कि, तुम्हाला त्याबद्दल काही शंका आहे, हनुमानाचे जन्मस्थान हे अंजनेरीच्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

अधिक वाचा ; IPLमध्ये १ ही सामना न खेळता दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला खेळाडू

शास्रार्थ सभेत साधू महंतांची हमरी तुमरी चर्चेचा विषय आहे

काल झालेल्या सभेत शिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला आहे. या सभेत महंतांनी चक्क गोविदानंद महाराज यांच्यावर माईक उगारल्याचा पहायला मिळाले आहे. सदर घटनेनंतर सोशल मिडियावरती हा मोठा चर्चेचा विषय देखील बनला गेला आहे. दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित शास्रार्थ सभा देखील गुंडाळण्यात आली. मात्र शास्रार्थ सभेत साधू महंतांची हमरी तुमरी चर्चेचा विषय झाली. महंतांनी महाराजावर माईक उगरल्याने रान चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळाले. सदर घटनेनंतर हनुमान जन्मस्थळ वाद बाजूलाच राहिला. त्यानंतर आज गोविदानंद महाराज यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगून गुजरातकडे रवाना झाले.

अधिक वाचा ; Vastu Shastra:या दिशेला घड्याळ लावल्याने चमकणार तुमचे नशीब 

सरकारचा पुरावा दाखवून अंजनेरी जन्मस्थळ सिद्ध होत नाही – गोविंदानंद महाराज

आज किष्किंधाचे गोविंदानंद महाराज यांनी नाशिकरोड येथील सिद्धपीठ आश्रम येथे झालेल्या शास्रार्थ सभेच्या गोंधळानंतर पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केला आहेत. सरकारचा पुरावा दाखवून अंजनेरी जन्मस्थळ सिद्ध होत नाही. त्यामुळे येथील धूर्त लोकांशी पुन्हा चर्चा काय करणार? असा सवाल त्यांनी यावेळी  उपस्थित केला. त्याचबरोबर, या पत्रकार परिषदेत हनुमानाचा जन्म हा अंजनेरी नसून किष्किंदा नगरी आहे असं गोविंदानंद महाराज यांनी म्हटलं आहे. त्यानंतर ते गुजरातला रवाना झाले आहेत. 

अधिक वाचा ; दीपनगर केंद्रातील टाकाऊ सेनोस्पिअर राखेची परदेशात निर्यात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी