नाशिक : तुनिशा शर्मा (Tunisha Sharma)आत्महत्येप्रकरणी (suicide)तिचा बॉयफ्रेंड (boyfriend)शिझान खान (Shizan Khan)याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे. सेटवरचं अभिनेत्रींनी अवघ्या 20 व्या वर्षी आपलं आयुष्य संपवलं. तिने हे पाऊल का उचललं हे आता स्पष्ट झालं आहे. परंतु भाजप नेत्यांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग दिला आहे? राम शिंदेंनंतर गिरीश महाजन यांनी हे प्रकरण लव्ह जिहाद (Love Jihad) असल्याचं म्हटलं आहे. (Tunisha Sharma Suicide case: After Ram Shinde, Girish Mahajan also said love jihad)
अधिक वाचा : Chanakya Niti :'या' तीन गोष्टी उद्धवस्त करतात माणसाचे आयुष्य
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, हे 'लव्ह जिहाद'चे प्रकरण असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशी प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपण पाहत आहोत आणि त्याविरोधात शिंदे सरकार कठोर कायदा आणण्याचा विचार करत असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी रविवारी दावा केला की अभिनेत्री तुनिशा शर्माचा मृत्यू हा लव्ह जिहादच्या प्रकरणातून झाला आहे. याप्रकरणी राज्य पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ते एएनआय या संस्थेशी बोलत होते.
अधिक वाचा : अवघ्या 9 महिन्यात 2 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या
भाजप आमदार राम शिंदे हे देखील या प्रकरणात आक्रमक झाले आहेत. शिंदेंनी हे लव्ह जिहाद प्रकरण असल्याची शक्यता वर्तवली आहे. तुनिशा शर्माच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जर हे लव्ह जिहादचे प्रकरण असेल तर त्याची चौकशी केली जाईल, तसेच या मागे कोणत्या संघटना आहेत हे शोधून काढलं जाईल. षडयंत्र रचणारे कोण आहेत, याचाही तपास केला जाईल असं राम कदम म्हणालेत.
अधिक वाचा : उत्तर भारतात सर्वाधिक हुडहुडी, राज्याातील तापमानही झालं कमी
आता गिरीश महाजन यांनी तोच राग आवळला आहे. परंतु पोलिसांना मात्र या प्रकरणात प्रकारचा पुरावा हाती लागलेला नाही, असं सांगण्यात येत आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की, आतापर्यंत इतर कोणत्याही प्रकरणाचा, ब्लॅकमेलिंगचा किंवा 'लव्ह जिहाद'चा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तपास सुरू असून, आरोपी शिझान खान आणि मृताचे फोन जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेतील अभिनेत्री तिचा सहकलाकार शीझानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. गेल्या 15 दिवसांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले होते. यामुळे तुनिशा ही नैराश्यात गेली होती.
शिझान खानने तुनिशाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप मृत अभिनेत्री तुनिशाच्या आईने आपल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान शिझान खान याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिझान खानला चार पोलिस कोठडीत देण्यात आली आहे.