[Video] राज ठाकरेंनी 'यांना' दिली गरोदर असल्याची उपमा... त्यानंतर मैदान दणाणून सोडले... 

नाशिक
Updated Oct 16, 2019 | 21:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता खिल्ली उडवली आहे. काही जण गरोदर असल्यासारखे दिसतात, असे म्हटल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

vidhansabha election 2019 raj thackeray mns nashik rally cm devendra fadanvis news in marathi
[Video] राज ठाकरेंनी 'यांना' दिली गरोदर असल्याची उपमा... त्यानंतर मैदान दणाणून सोडले...  

नाशिक :  विकास कसा होऊ शकतो याचे उदाहरण देताना  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरावरून त्यांची खिल्ली उडवली. पुरूष गरोदर होत नाही, याशिवाय अजून कोणतीही गोष्ट अशक्य नाही,  पण आज काल काही लोक दिसतात गरोदर असल्यासारखे असे म्हणत राज ठाकरे थांबले. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या आणि चित्कार काढत राज ठाकरेंच्या या विधानाला डोक्यावर घेतले. 

माझं असं आहे बाप दाखवं नाही तर श्राद्ध करा, मी आज पर्यंत जगात पाहिले नाही आहे, भविष्यात होऊ शकेलही, पण पुरूष गरोदर राहिला आहे या शिवाय कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पण काही काही जण वाटताही आजही...  त्यानंतर उपस्थिती मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राज ठाकरे यांच्या वाक्यावर शिट्ट्या, टाळ्या, आरोळ्या मैदानात घुमू लागल्या. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले,  तुम्हांला कोण दिसलं मला माहिती नाही. या वाक्यालाही प्रचंड टाळ्या आणि शिट्या वाजल्या. मग राज ठाकरे म्हणाले, जो कोणी दिसला असले, त्यात आनंद माना...  मग मनसैनिकांमधून एक एक नावं यायला लागली. त्यावर राज ठाकरे म्हणाले मी येवढी नावं नाही घेऊ शकत.  मग सभेतून आवाज आला टरबूज टरबूज... हा आवाज राज ठाकरेंना ऐकू आला नाही. व्यासपीठावरील मनसेच्या एका उमेदवाराने टरबूज बोलत असल्याचे राज ठाकरेंना सांगितले. 

राज ठाकरे यांनी उपस्थितांना प्रति प्रश्न केला... तुम्हांला जॅकेट म्हणायचे आहे... का टरबूज... हे ऐकताच पुन्हा मैदाना आरोळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणून गेले. हे ऐकून राज ठाकरेंनाही हसू आवरले नाही ते खळखळून हसू लागले. 

राज ठाकरे आपल्या भाषणात अनेकांची मिमिक्री करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यंदा त्यांनी कोणाची मिमिक्री केली नाही. पण उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करून आपल्या ठाकरी भाषणाच्या शैलीची झलक दाखवली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी