'आम्ही मोदींकडे हात जोडून विनंती केली, संभाजीराजेंनी दिल्लीतही मोर्चा काढावा' -संजय राऊत

नाशिक
भरत जाधव
Updated Jun 13, 2021 | 18:42 IST

संभाजीराजे यांची वाढती आक्रमकता पाहता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना दिल्लीत मोर्चा काढण्याचा सल्ला दिला आहे. 

Sanjay Raut
आम्ही मोदींकडे हात जोडून विनंती केली -संजय राऊत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मराठा आरक्षणाची ठाम भूमिका केंद्र सरकारच घेईल
  • संभाजीराजे यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी - संजय राऊत
  • पाच वर्ष हे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार

नाशिक :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या शिष्टमंडळांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन विनंती केली आहे. संभाजीराजेंनी (SambhajiRaje) मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी दिल्लीतही मोर्चा काढावा' असा सल्ला शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी दिला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) हे उत्तर महाराष्ट्राच्या (North Maharashtra) दौऱ्यावर आहेत. आज नाशिक (Nashik)मध्ये पत्रकार परिषद (Press conference) घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संभाजीराजे छत्रपत्री यांनी मराठा आरक्षणासाठी विविध नेते मंडळींच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यातील कोल्हापुरात पहिला मराठा आरक्षण मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी शिवराज्यभिषेकाच्या दिवशी रायगडावरुन केली. संभाजीराजे यांची वाढती आक्रमकता पाहता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना दिल्लीत मोर्चा काढण्याचा सल्ला दिला आहे. 
'संभाजीराजे यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी. मराठा आरक्षण ठाम भूमिका केंद्र सरकारच घेऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊ हात जोडून विनंती केली आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी निर्णय घ्यायचा आहे ' असे म्हणत राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू पंतप्रधानांच्या कोर्टात टोलवला.

'शिवसेनेकडेच राहिल मुख्यमंत्रीपद '

'आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाची वाटणी होत होती. पाच वर्ष हे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटलं आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केलं' असे राऊत यांनी स्पष्ट केले. 'महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. तिन्ही पक्ष एकत्र आले आणि सरकार स्थापन केले. तिन्ही पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कॉग्रेस पक्षातच नाही तर अनेक पक्षात दावेदार आहे. मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणे गैर नाही. 3 स्वतंत्र विचारधारेचे पक्ष आहे' असेही राऊत म्हणाले.

पक्षसंघटनेचे काम चांगले सुरू

आगामी काळात, कोणत्या दिशेने जायच आहे, त्यानुसार काम सुरू आहे संघटनेला गती मिळण्यासाठी हा दौरा आहे. उत्तर महाराष्ट्रच योगदान महत्वाचे आहे. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्र साथ गरजेची आहे. शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावे, आमचे सर्व लोक चांगले काम करतात. आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होत आहे. पक्षात कायम बदल होतात, मात्र घडी बसवली आहे, बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावे. आमचे सर्व लोक चांगले काम करतात. आता हळूहळू संघटनेचे काम चांगलं होत आहे. 

शरद पवार अन् प्रशांत किशोर यांच्या भेटीत गैर काय

'प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक भेटी झाल्यात. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट झाली आहे. आम्ही सुद्धा त्यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय परिस्थिती, निवडणुकांबाबत माहिती गोळा करून ती पक्षांना देणे हे त्यांचे काम आहे. कधीकाळी प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत होते. पंजाबमध्ये कॅप्टन अमेंद्ररसिंग, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम केले आहे. शिवसेनेसाठी सुद्धा त्यांनी काम केले आहे. याचा वेगळा अर्थ काढू नये. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी