YCMOU च्या परीक्षा मंगळवार ८ फेब्रुवारीपासून

नाशिक
रोहन जुवेकर
Updated Feb 07, 2022 | 05:39 IST

YCMOU Exams Will Be Conducted From 8th February 2022 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University - YCMOU) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या हिवाळी परीक्षा ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने मंगळवार ८ फेब्रुवारी २०२२ ते शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार

YCMOU Exams Will Be Conducted From 8th February 2022
YCMOU च्या परीक्षा मंगळवार ८ फेब्रुवारीपासून 
थोडं पण कामाचं
  • YCMOU च्या परीक्षा मंगळवार ८ फेब्रुवारीपासून
  • हिवाळी परीक्षा ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने मंगळवार ८ फेब्रुवारी २०२२ ते शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार
  • ७७ हजार ७८९ विद्यार्थी परीक्षा देणार

YCMOU Exams Will Be Conducted From 8th February 2022 : नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University - YCMOU) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या हिवाळी परीक्षा ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने मंगळवार ८ फेब्रुवारी २०२२ ते शनिवार १९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. परीक्षेत कॉपी करणाऱ्या अथवा इतर कोणताही गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रमाद समितीला सामोरे जावे लागेल. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर परीक्षेच्या वेळेत लक्ष ठेवले जाईल.

यंदा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ७७ हजार ७८९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत पाच तासांच्या स्लॉटमध्ये असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपलब्धतेनुसार ही परीक्षा द्यायची आहे. 

परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता कायम केली आहे आणि ज्यांना कायम नोंदणी क्रमांक मिळाला आहे असे विद्यार्थीच परीक्षा देऊ शकतील. तात्पुरती पात्रता झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. मात्र, त्यांचे निकाल जाहीर होणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तात्पुरते प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासकेंद्रांशी संपर्क करून पात्रतेची कागदपत्रे विद्यापीठाच्या nondani@ycmou.digitaluniversity.ac या ई-मेलवर पाठवून आपला प्रवेश तात्काळ कायम करून घ्यावा लागणार आहे. ऑनलाइन परीक्षेच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली असून, आठ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ही मॉक टेस्ट देता येणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या २१ डिसेंबर २०२१ ते नऊ जानेवाारी २०२२ या काळात झालेल्या परीक्षेतदेखील प्रॉक्टर्ड पद्धत वापरली होती. त्यात ३९० विद्यार्थ्यांनी पाचपेक्षा अधिक वेळा सूचना देऊनही गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले. या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे. परीक्षा गैरप्रकार समितीसमोर या विद्यार्थ्यांच्या केसेस ठेवण्यात आल्या असून, चौकशी समीतीच्या निर्णयानंतर संबंधितांचा निकालावर कार्यवाही होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी