Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी

नाशिक
Updated Jul 22, 2022 | 13:17 IST

Aaditya Thackeray on Shinde Camp: एकनाथ शिंदे यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. आमदार आणि खासदारांसोबतच नगरसेवक, सेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होताना दिसून येत आहे. त्याच दरम्यान आता आदित्य ठाकरेंनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. 

Matoshree's doors are never closed: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवसेनेतून मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. नगरसेवकांपासून ते खासदारांपर्यंत सर्वच जण एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे आपला पाठिंबा देत आहेत. त्याच दरम्यान आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपली शिव संवाद यात्रा सुरू केली आहे. आदित्य ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर असून यावेळी ते आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या नांदगाव मतदारसंघात मेळावा घेणार आहेत. आदित्य ठाकरे हे नांदगावमध्ये येत असल्याने स्थानिक आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं. (Aaditya Thackeray said Matoshree doors are never closed to anyone)

बंडखोरी केलेले आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरेंची भेट घेणार असल्याने चर्चांना उधाण आले. याच मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, भेटू ना निश्चितच भेटू... त्यांनी मातोश्रीवर पण यावं भेटू... आम्ही कधीच कोणासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते.

अधिक वाचा : Suhas Kande: शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड खळबळजनक आरोप

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या विधानामुळे आता मातोश्रीकडून शिंदे गटाला एकप्रकारे चर्चेसाठीच आमंत्रण दिलं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता आमदार सुहास कांदे हे नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांची भेट घेणार की थेट मातोश्रीवर जाऊन चर्चा करणार हे पहावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी