नाशिक : देशसेवेची तळमळ आणि तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष रणभूमीवर जाण्यासाठी तयार झालेल्या लढाऊ वैमानिकांचे दिमाखदार शिस्तबध्द संचलन देशभक्तीने भारावलेल्या लष्करी बँड पथकाच्या तालावर नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर बुधवारी सकाळी पार पडले. (Convocation ceremony of 38th batch of pilots in Dimakh)
अधिक वाचा : Osmanabad । आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या जिल्ह्यातील रुग्णालयाची केंद्रीय मंत्र्यांकडून पोलखोल!
निमित्त होतं, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या 3८ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे. कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात दीक्षांत संचलनाला सुरुवात झाली. यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
अधिक वाचा : Maharashtra Border village: राज्याच्या सीमाभागातील गावांना आवडे शेजारील प्रांत; नांदेड, नाशिकमधील नागरिकांचा इशारा
दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. हवेत करण्यात आलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूने उपस्थितांची मने जिंकली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, एकाचवेळी चार चार हेलिकॉप्टरवर हल्ला करून जाणे, अशी हृदयाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर झाली.