कोरोनाविरुद्ध जनजागृतीसाठी वडिलांनी लिहिले रॅप साँग, 'आई-मुलाने' गायले होतयं व्हायरल 

नाशिक
Updated Apr 08, 2020 | 19:01 IST

कोरोना विरुद्ध जनजागृतीसाठी चांदवड येथील प्राथमिक शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी एक मराठीत रॅप सॉंग लिहिले आहे. ते येवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी हे रॅप साँग आपली पत्नी अश्विनी सोनावणे आणि मुलगा सुमीत सोनावणे या

चांदवड :  कोरोना विरुद्ध जनजागृतीसाठी चांदवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक प्रफुल्ल सोनवणे यांनी एक मराठीत रॅप सॉंग लिहिले आहे. ते येवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी हे रॅप साँग आपली पत्नी अश्विनी सोनावणे आणि मुलगा सुमीत सोनावणे या आई मुलाकडून गाऊनही घेतले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कोरोनाचे संकट जगावर आले असताना कशी काळजी घेतली पाहिजे. देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला आवाहन करताहेत की घरीच राहा. त्याचे पालन करण्याचे आवाहन गाण्याच्या रुपात सोनवणे कुटुंबाने केले आहे.  सोनवणे कुटुंबाने आपली सामाजिक जबाबदारी या रॅप साँगच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला आहे. 

यात लॉक डाऊनच्या काळात कुटुंबातील व्यक्तींनी काय करायला हवे. घराबाहेर न पडता कसे आपले छंद जोपसले पाहिजे याचे आवाहन या रॅप साँगमध्ये केले आहे. अश्विनी सोनावणे यांनी आपल्या मधूर आवाजात हे गाणे म्हटले आहे. तसेच सुमीत सोनावणे काही प्रमाणात बीटबॉक्सिंग म्हणजे तोंडाने संगीत देत आपल्या आईला साथ दिली आहे. तसेच आई-मुलाने रॅपरचा लूक येण्यासाठी डोक्यावर तिकरी टोपी परीधान केली आहे. 

या सोनावणे कुटुंबाच्या प्रयत्नाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही पण सोनावणे कुटुंबाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरीच राहल अशी अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी