[VIDEO]: धुळ्यात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, १२ जणांचा मृत्यू

नाशिक
Updated Aug 31, 2019 | 15:14 IST

धुळ्यातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Blast in Chemical Company
धुळ्यात केमिकल कंपनीत भीषण स्फोट 

थोडं पण कामाचं

  • धुळ्यात केमिकल कंपनीत भीषण स्फोट
  • १२ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, मृतकांचा आकडा वाढण्याची भीती
  • स्फोटामुळे कंपनीला लागली आग
  • स्फोटामुळे कंपनीच्या परिसरात हादरे
  • कंपनीत आणखीनही काही कर्मचारी अडकल्याची शक्यता
  • जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल

धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील येथील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. सकाळच्या सुमारास हा स्फोट झाला असून या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटातील मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे परिसरात मोठे हादरे बसल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात ५८ जण जखमी झाले आहेत. मृतकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

स्फोटामुळे कंपनीत आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


ही केमिकल कंपनी नेमकी कसली आहे याची माहिती मिळालेली नाहीये तसेच स्फोट नेमका कसला झाला आहे त्याचीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. 

 

कंपनीत अद्यापही काही कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर आगही लागली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. तसेच स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...