Nashik Fire : इगतपुरीत जिंदाल कंपनीला आग, 2 ठार आणि 17 जखमी

नाशिक
Updated Jan 02, 2023 | 10:42 IST

Fire at Jindal Company in Igatpuri, 2 killed and 17 injured : महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत रविवार 1 जानेवारी 2023 रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागली.

थोडं पण कामाचं
  • इगतपुरीत जिंदाल कंपनीला आग, 2 ठार आणि 17 जखमी
  • आगीत जखमी झालेल्या 19 कामगारांपैकी 2 कामगारांचा मृत्यू
  • मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर, जखमींच्या उपचारांचा खर्च शासन करणार

Fire at Jindal Company in Igatpuri, 2 killed and 17 injured, Massive Fire Breaks Out At Jindal Company In Nashik District : महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत रविवार 1 जानेवारी 2023 रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या आगीत जखमी झालेल्या 19 कामगारांपैकी 2 कामगारांचा मृत्यू झाला. यामुळे दुर्घटनेतील मृत कामगारांची संख्या 2 आणि जखमी कामगारांची संख्या 17 झाली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये राज्य शासनाकडून मदत देण्यात येणार आहेत. तसेच जखमींवर राज्य शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. तसेच मृतांच्या नातलगांची विचारपूस केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार,  बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून मदतकार्याचा आढावा घेतला.

Pausha Putrada Ekadashi Vrat Kataha: पुत्रदा एकादशी 2023; जाणून घ्या व्रत कथा, शुभ मुहूर्त, पूजा विधी

Pausha Putrada Ekadashi 2023 : कधी आहे 2023 मधील पहिली एकादशी?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी