Bus Accident, Road Accident : शिर्डीला निघालेल्या ठाणे जिल्ह्यातील भक्तांच्या बसची ट्रकशी टक्कर, 10 जणांचा मृत्यू

नाशिक
Updated Jan 13, 2023 | 11:26 IST

horrific road accident, devotee bus accident in nashik : सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांची टक्कर झाली.

थोडं पण कामाचं
  • शिर्डीला निघालेल्या ठाणे जिल्ह्यातील भक्तांच्या बसची ट्रकशी टक्कर
  • 10 जणांचा मृत्यू
  • अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 50 जण होते अशी प्राथमिक माहिती

horrific road accident, devotee bus accident in nashik : सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांची टक्कर झाली. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 50 जण होते. बसमधील प्रवाशांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला.

सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथेर गावच्या जवळ खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. जखमींना सिन्नर आणि नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मृतांमध्ये एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी यांचा समावेश असल्याचे समजते. पण या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर येथून साई भक्त शिर्डी येथे दर्शनाला जात असताना अपघात झाला. उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला अपघात झाला. शिर्डीच्या दिशेने निघालेल्या खासगी आराम बस क्रमांक एम एच ०४ एसके २७५१ आणि शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने जात असलेल्या मालवाहक ट्रक क्रमांक एम एच ४८टी १२९५ यांची समोरासमोर टक्कर झाली.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अपघाताविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई ते रायगड अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार, वाचा कसा आहे देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

Sea Links to ease Mumbai roads : नरिमन पॉइंट ते विरार एका तासात, 5 सी लिंकमुळे प्रवास होणार सुपरफास्ट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी