चांदवड : चांदवड तालुक्यातील पुरी येथील सकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्यांच्या विहिरीत बिबट्या पडला. यानंतर मोजे पुरी तालुका चांदवड येथील सरपंच बाप्पू भवर यांनी वन परिमंडळ अधिकारी वडनेर भैरव यांना फोन करून माहिती दिली. हा बिबट्या धर्मा शंकर भवर राहणार पुरी तालुका चांदवड यांच्या शेत गट नंबर 409 मधील विहिरीत पडलेला आढळून आला अशी माहिती वन अधिकाऱ्यांना दिली.
त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वनीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांची वाट न बघता विहिरीत दोरखंडाच्या साह्याने खाट सोडले असता त्यावर वन्यप्राणी बिबट्या हा त्या खाटेवर येऊन बसला आहे यावरून त्यानंतर चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय अधिकारी संजय वाघमारे हे आपल्या ताफ्यासह पुरी या गावात हजर झाले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा सोडून त्यास पिंजरामध्ये बिबट्या बंद करून त्याच चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यास वन आधी निवास येथे सोडण्यात आले.