Sanjay Raut : महाराष्ट्र पोलीस पाताळातूनही गुन्हेगार शोधून काढतील - संजय राऊत

नाशिक
Updated Dec 29, 2021 | 18:59 IST

अटकेची टांगती तलवार असताना भाजपचे आमदार नितेश राणे सध्या आऊट ऑफ रीच आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस पाताळातूनही गुन्हेगार शोधून काढतील असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र पोलीस पाताळातूनही गुन्हेगार शोधून काढतील
  • राज्यपालांच्या मनाला नेमकं काय लागलं आहे हे त्यांनी सांगावे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे

Sanjay Raut  : नाशिक : अटकेची टांगती तलवार असताना भाजपचे आमदार नितेश राणे सध्या आऊट ऑफ रीच आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस पाताळातूनही गुन्हेगार शोधून काढतील असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीची राज्य सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे, राज्यपालांच्या मनाला नेमकं काय लागलं आहे हे त्यांनी सांगावे असेही राऊत म्हणाले. 

संजय राऊत आज नाशिक दौर्‍यावर होते, तेव्हा पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत, मी कुठल्याही नेत्यावर टीका करत नाहिये परंतु महाराष्ट्र पोलीस पाताळातूनही गुन्हेगारला शोधून काढतील असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार हे बहुमतातले सरकार आहे, या सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. सुधीर मुनंगटीवर म्हणाले होते की हे सरकार बरखास्त नाही झाले तर नाव बदले, सुधीर मुनंगटीवार यांना विचारा की, राष्ट्रपती तुमच्याकडे चंद्रपुरात गोट्या खेळायला येतात का? की तुम्ही राष्ट्रपतीकडे भांडी घासायला असता असे म्हणून राऊत यांनी मुनंगटीवार यांच्यावर टीका केली. 
भरती घोटाळ्याची कागपत्र माझ्याकडे आली आहेत, ही कागदपत्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही पोहोचले आहे. हे प्रकरण खूप गंभीर असल्याचेही राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्रातील नेत्यांना गोवण्यात येत आहे असे राऊत म्हणाले. तसेच माझ्यावरही अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणा मागे लावून मला गोवण्याचा प्रयत्न झाला असे राऊत यावेळी म्हणाले.
भाजपच्या सांगण्यावरून केंद्रीय यंत्रणा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी