Tanker Fire : नाशिकमध्ये इंडियन ऑइल कंपनीच्या टॅंकरला भीषण आग

नाशिक
Updated Jan 08, 2022 | 22:22 IST

Tanker Fire नाशिकच्या मनमाड चांदवड मार्गावरील हरनोल येथील जुना टोल नाका जवळ इंडियन ऑइल कंपनीच्या टॅंकरला अचानक आग लागली. वेळीच ही आग विझवण्यात आली असून सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

थोडं पण कामाचं
  • नाशिकच्या मनमाड चांदवड मार्गावर जवळ इंडियन ऑइल कंपनीच्या टॅंकरला अचानक आग
  • वेळीच ही आग विझवण्यात आली
  • सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

Tanker Fire : नाशिक : नाशिकच्या मनमाड चांदवड मार्गावरील हरनोल येथील जुना टोल नाका जवळ इंडियन ऑइल कंपनीच्या टॅंकरला अचानक आग लागली. वेळीच ही आग विझवण्यात आली असून सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

आज साडेतीन वाजेच्या सुमारास मनमाड येथून इंडियन ऑइल कंपनीचा हा तेलाने भरून मनमाड ते चांदवड मार्गावरून जात होता. तेव्हा चांदवड तालुक्यातील हारणुल येथील जुन्या टोल नाक्याजवळ तेलाने भरलेला असताना त्या टॅंकरलाअचानक आग लागली. या आगीत पुढील केबिन संपूर्ण जळून खाक झाली. या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. तसेच ही आग विझवण्यासाठी हारणुल येथील शेतकरी राजाराम निकम,  विलास गांगुर्डे, अशोक निकम, बाबाजी निकम,हरीश वानखेडे यांनी मदत  कार्य केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी