Nashik: नाशिककरांनी पहिल्यांदाच बिबट्या पाहिला वाटतं?

नाशिक
Updated Nov 23, 2022 | 17:13 IST

Nashik Leopard: नाशिकमध्ये बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. पण याच गर्दीने जो धुमाकूळ घातला तो अत्यंत किळसवाणा होता. पाहा नेमकं काय झालं.

थोडं पण कामाचं
  • नाशिक, बिबट्या अन् हुल्लडबाजांचा धिंगाणा...
  • नाशिकमधील शहरी भागात घुसला बिबट्या
  • बिबट्याला पाहण्यासाठी शेकडो जणांची गर्दी

Nashik Leopard Video: नाशिक: नाशिकमध्ये बिबट्या दिसणं ही काही आता WoW करावं अशी गोष्ट राहिलेली नाही. नाशिकमधील शहरीकरण झपाट्याने वाढल्याने येथील जंगली भाग हळूहळू नामशेष होऊ लागला आहे. अशावेळी अनेक श्वापद हे भक्ष्याच्या शोधात थेट शहरी भागात घुसू लागले आहेत. त्यामुळे अनेकदा नाशिकमध्ये बिबट्या आणि इतर काही श्वापदं पाहायला मिळतात. मात्र, मंगळवारी रात्री नाशिककरांनी जणू काही बिबट्या पहिल्यांदाच पाहिलाय अशा अविर्भात प्रचंड हुल्लडबाजी करत धिंगाणा घातला. (nashikkar like a saw leopard for first time youths have created huge obstacles in work of forest department)

त्याचं झालं असं की, नाशिक शहरातील वडाळा रोडवरील हॉटेल साई प्रितमच्या मागील परिसरात मंगळवारी रात्री एका बंगल्याच्या आवारात एक बिबट्या दिसून आला. हा... हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बिबट्याला या संपूर्ण परिसरात पाहण्यासाठी शेकडो जणांची गर्दी झाली. 

अधिक वाचा: सीबीआयच्या निष्कार्षामुळे राणे पितापुत्र ठरले खोटारडे

बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी आपण समजू शकतो. पण त्यानंतर या गर्दीने जी हुल्लडबाजी केली तो प्रकार खरोखरच किळसवाणा होता. एकीकडे वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असताना दुसरीकडे नाशिकमधील काही तरुण मात्र, आपल्या हुल्लडबाजीने बिबट्याला अधिकच चेतवत होते. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे या गर्दीला, हुल्लडबाजांना आवर घालावा याचं भान कुणालाही नव्हतं.

अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनतर बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात सापडला. त्याला तात्काळ गुंगीचं इंजेक्शन देऊन बेशुद्धही करण्यात आलं. पण तिथंही अनेक तरुणांनी प्रचंड गोंधळ करुन वनविभागाच्या कामात अडथळा आणला. अखेर वनविभागाने प्रचंड मेहनत करुन बिबट्याला अधिवासात नेऊन सोडलं. 

अधिक वाचा: Devendra Fadnavis: 40 गाव सोडा... महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले

खरं तर माणसानं घुसखोरी केल्याने ही जंगलातील श्वापदं शहरात घुसू लागलीयेत. पण या सिमेंट-क्राँकिटच्या जंगलात त्यांच्यापेक्षाही भयंकर श्वापदं राहतात हे पाहून ती जनावरंही शरमली असतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी