Chhagan Bhujbal : टाटाकडे कुणीही टक्केवारी मागणं शक्यच नाही - छगन भुजबळ

नाशिक
Updated Oct 29, 2022 | 17:04 IST

Chhagan Bhujbal : महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातमध्ये जात आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची शक्ती कमी पडत आहे अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच टाटाकडे कुणीही टक्केवारी मागणे अशक्य आहे असेही भुजबळ म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातमध्ये जात आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची शक्ती कमी पडत आहे
  • अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.
  • तसेच टाटाकडे कुणीही टक्केवारी मागणे अशक्य आहे असेही भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal : नाशिक : महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातमध्ये जात आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची शक्ती कमी पडत आहे अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच टाटाकडे कुणीही टक्केवारी मागणे अशक्य आहे असेही भुजबळ म्हणाले. (no one demand percentage to tata industry says ex minister and ncp leader chhagan bhujbal)

अधिक वाचा : मोठी बातमी ! मविआ नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काढली तर मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ

नाशिक जिल्ह्यातील  निफाड तालुक्यात स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लिमिटेड रानवड यांच्या 40 वा गळीत हंगामा प्रसंगी भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा भुजबळ म्हणाले की, अनेक प्रकल्प राज्याच्या बाहेर चालले आहेत, तेव्हा सत्ताधारी पक्षाचे आमदार आरोप करतात की टक्केवारी मागितली म्हणून हे प्रकल्प बाहेर चाले आहेत. त्यामुळे मुख्य मुद्दा बाजूला राहतो. टाटाकडे कुणीही टक्केवारी मागणेच शक्य नाही. टाटाचे काम एकदम चोख असतं, मी मुंबईचा दोन वेळा महपौर होतो. रतन टाटांची आणि माझी चांगली ओळख आहे. सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना त्यांना मी पत्र लिहिले होते आणि नाशिकमध्ये लढाऊ विमाने बनवण्याचा कारखाना व्हावा अशी मी मागणी केली होती. कारण नाशिकमध्ये आधीच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स कंपनी आहे. या कंपनीचा फायदा झाला असता, कुशल मनुष्यबळ मिळालं असतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये हा कारखाना व्हावा अशी मागणी केली. नागपूर हे मध्य ठिकाणी आहे म्हणून आम्हीही त्याला विरोध केला नाही. परंतु आता हा प्रकल्पही राज्याच्या बाहेर चालला आहे. प्रकल्प राज्यात आणण्याच्या बाबतीत फडणवीस यांची शक्ती कमी पडत आहे अशी टीकाही भुजबळ यांनी केली आहे. 

अधिक वाचा :  Praniti Shinde: 'मोदींनी सुरू केलाय हम बोले सो..', प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी