Sanjay Raut । संजय राऊत यांनी नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी 

नाशिक
Updated Dec 15, 2022 | 14:17 IST

अहमदाबाद विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची झालेल्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.  नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई :  अहमदाबाद विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची झालेल्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.  नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Sanjay Raut Press conference in Nashik read in marathi)

मला वाटलं परवा अहमदाबाद विमानतळावर महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सुटला असेल. पण तसेच काही झाले नाही.  चालता चालता दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री बोलत होते. देशाच्या गृहमंत्र्यांना अधिकार आहेत.  हे सर्व वाद त्यांच्या खात्याच्या अंतर्गत येतात. गृहमंत्र्यांना अधिकार आहे, की जो काही अशांत भाग आहे तो केंद्र शासित करता येतो. दोन्ही मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटून हा विवादीत भाग केंद्रशासित करण्याची मागणी करत असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू असे राऊत म्हणाले. 

राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे... 

गांधी यांच्यां पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला आहे
अनेक दिवस तुरुवास भोगावा लागला
गांधी यांचे पुस्तक वाचतोय त्यांनी काही अनुभव लिहिले, त्याला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले
राज्यांतील पुरस्कार रद्द करण्याची गरज नाही
आम्ही लिहिणारे लोक आहेत काही पुरस्कार आपल्याला पटत नाही
पण समितीने पुरस्कार देताना विचार केला असेल
दिलेला पुरस्कार परत घेणे योग्य नाही
एक मोठा वर्ग नाराज झालाय

सुषमा अंधारे यांना घातले पाठीशी 

एक विशिष्ट गट आहे, उध्दव ठाकरे आणि शिवसेना कायम वारकरी बरोबर आहे
7/8 वर्षात भाजप चे लोक टीका करत आहे
भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे

बच्चू कडू पुन्हा आमच्याकडे येतील 

आमचे सरकार आल्यावर बचू कडू आमच्या सोबत येतील
राज्यात असे काही नेते आहेत सरकार जिथे तिथे जातात

सुषमा अंधारेवर बोलणारे राज्यपाल आणि इतर नेते बोलतात त्यावर का बोलत नाही
वारकरी बाबत बोलतात ते शिवाजी महाराज यांचा अपमान होतो तेव्हा का बोलत नाही
वर्तमानवर बोला, जुने व्हडिओ व्हायरल करण्यात काय अर्थ आहे
मोर्चाला परवानगी दिली नाही तरी 17 तारखेचा मोर्चा निघणार
आजवर निघाला नाही असा मोर्चा निघणार

जिहाद सर्व धर्मात 

जिहाद सर्व धर्मात सुरू आहे, कोणत्याही धर्माच्या जातीतील महिलांवर होणारे अत्याचार कोणाला मान्य नाही
निर्भयाच्या गाड्या खोके गद्दार अमदारांसाठी दिल्या जातात हे दुर्दैव आहे
पराभवाची भीती आहे, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लांबविल्या जात आहेत
-
हेंमत गोडसे मछर आहे, त्याला कोणीही पाडू शकते
ते विद्यमान खासदार होते त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली, यांच्यां विषयी पक्षात तेंव्हाही नाराजी होती
-
चीन विषयी कोणीही मोठा नेता बोलत नाही पाकिस्तानचे  नाव घेतात मात्र चीनचे नाव घेत नाही, चीनला घाबरतात
-
अमित शहा म्हणतात जमीन जाऊ देणार नाही मात्र जमीन याआधीच गेली आहे

पाकव्याप्त काश्मीरच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत,
काश्मीरी पंडिताची हत्या होत आहे
गुजरातच्या निवडणूक झल्यात आणि अचानक चीनने घुसखोरी कशी केली
- लोकसभा निवडणुका जवळ येतील तसे भारत पाकिस्तान मुद्दे सुरू होतील

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गुजरात विमानतळवरच सुटेल असे वाटत होते, 
 सीमा भागावरून कर्नाटकचा बंदोबस्त काढून केंद्राची सुरक्षा का उभी केली नाही

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी