धुळ्यातून तृतीयपंथी चाँद तडवी देतेय पोलीस भरतीची परीक्षा

नाशिक
Updated Jan 06, 2023 | 21:30 IST

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या 62 वर्षांत प्रथमच तृतीयपंथी पोलीस भरतीत उतरणार आहे. भुसावळच्या या  27 वर्षीय चाँदच्या भरतीमुळे यंदाची पोलीस भरती इतर वर्षांपेक्षा वेगळी ठरणार आहे.

थोडं पण कामाचं
  • 116 वर्षात प्रथमच तृतीयपंथी देणार प्रवेश परीक्षा
  • भरती 42 पदांसाठी, अर्ज आले 3 हजार 900
  • प्रेरणास्थान आहेत आर्या पुजारी

Dhule धुळे : इंग्रजांच्या काळापासून म्हणजेच गेल्या 100 - 120 वर्षात जे झालं नाही, ते या वर्षी होणार आहे. राज्य पोलीस दलात (Maharashtra Police) जवळपारस 116 वर्षात प्रथमच एका तृतीयपंथी पोलीस भरतीचे (Maharashtra Police Recruitment 2023) आव्हान स्वीकारले आहे. (Third gender Chand Tadvi attempting Maharashtra Police Recruitment 2023 from Dhule )

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या 62 वर्षांत प्रथमच तृतीयपंथी व्यक्तिला पदभार स्विकारता येणार आहे. भुसावळच्या या 27 वर्षीय चाँदच्या भरतीमुळे यंदाची पोलीस भरती इतर वर्षांपेक्षा वेगळी ठरणार आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्हयात राहाणाऱ्या चाँद तडवी उर्फ बेबो पार्वती जोगी यांनी पोलीस दलात भरती होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. वर्षभराच्या तयारीमुळे त्या 6 जानेवारी 2023 ला (शुक्रवार) होणाऱ्या चाचणीला संपूर्ण आत्मविश्वासाने सामारे जाणार आहेत. 

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सध्या 42 पदांसाठी भरती केली जात आहे. पदांची संख्या जरी कमी असली तरी त्या पदांसाठी 3 हजार 900 पेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. चाँद यांनी पुस्तकी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलाच. मात्र त्या सोबतच फिजिकल पार करण्यासाठी मैदानी सरावाकडे ही लक्ष दिले आहे. विशेषतः गोळाफेक आणि धावण्यामुळे त्या उजव्या ठरणार आहेत. 

2021 मध्ये केलेला अर्ज

या पूर्वी म्हणजेच 2021 साली चाँद यांनी पोलिस भरतीसाठी महिला प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. परंतु नुकतच सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांसाठी शासकीय सेवेत वेगळे म्हणजेच थर्ड जेंडरचे स्थान निर्माण केले आहे. म्हणून त्यांनी थर्ड जेंडर म्हणून उमेदवारी नमूद केली आहे. 

पोलीस झाल्या तर..

पोलीस झाली तर समाजसेवेलाच प्राधान्य राहील. शिवाय तृतीयपंथीयांचा सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करेन, असं त्या म्हणाल्या. 

कोण आहेत गुरू.. 

चाँद तडवी उर्फ बेबो पार्वती जोगी यांचा हा प्रवास निश्चितच सहज, सोपा नव्हता. खडतर परिश्रम करताना कुटुंबियांनी आधार दिल्याचे त्या आवर्जून सांगतात. पार्वती परशुराम जोगी हे त्यांचे गुरू आहेत तर थर्ड जेंडरच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आर्या पुजारी त्यांच्या प्रेरणास्थान आहेत. प्रशिक्षक इरफान शेख यांच्यासह स्वरा जोगी, संदल जोगी, निलू जोगी, समीभा पाटील, दिशा पिंकी शेख, मयुरी आवडेकर, विक्की शिंदे, समाधान तायडे या हितचिंतकांनी त्यांचे नेहमीच मनोबल वाढवले असं चाँद अभिमानानं सांगत होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी