सत्तेत असताना 15 वर्षांत कोणतीही फाईल घेऊन गेलो तर ती कचराच्या डब्यात जायचीः उदयनराजे 

पुणे
Updated Sep 15, 2019 | 22:05 IST

साताऱ्यात आज झालेल्या महाजनादेश यात्रेच्या सभेत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं कौतुक देखील केलं आहे.

mahajanadesh yatra
सत्तेत असताना 15 वर्षांत कोणतीही फाईल घेऊन गेलो तर ती कचराच्या डब्यात जायचीः उदयनराजे   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  •  उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
  • राष्ट्रवादीची सत्ता असताना जनतेची घेऊन गेलेली कामं कधीच झाली नाही असं म्हणत, गेल्या १५ वर्षांत मी कोणतीही फाईल घेऊन गेलो तर ती फाईल कचऱ्याच्या डब्यात जायची असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
  • आज भाजप प्रवेशानंतर उदयनराजे यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभेत काँग्रेस- राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

साताराः  उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा जाहीर सभेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीची सत्ता असताना जनतेची घेऊन गेलेली कामं कधीच झाली नाही असं म्हणत, गेल्या १५ वर्षांत मी कोणतीही फाईल घेऊन गेलो तर ती फाईल कचऱ्याच्या डब्यात जायची असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. आज भाजप प्रवेशानंतर उदयनराजे यांनी साताऱ्यात महाजनादेश यात्रेच्या सभेत काँग्रेस- राष्ट्रवादीवर टीका केली आहे. सत्तेच्या काळात माझी कामं केली नाहीत तरी राष्ट्रवादीनं मला किमान सहनशीलतेचा पुरस्कार तरी द्यायला हवा होता, असंही ते म्हणाले. सत्तेत असताना एक रूपयाचंही काम झालं नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी उदयनराजेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आमच्या मागण्यांकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केल आहे. तसंच यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पक्षाची आज असलेल्या स्थितीबद्दल आत्मचिंतन करण्याचा सल्ला देखील दिला आहे. उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामकाजावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, सत्ता असताना त्या काळात सरकारची इच्छाशक्ती आणि नियोजन नसल्यामुळे कामं झाली नाहीत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यभाराची स्तुती करत उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यासाठी हजारो कोटींची कामं मार्गी लावली असल्याचं सांगितलं. 

 

 

यावेळी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला हे देखील सांगितलं आहे. लोकांची कामं करायची असेल तर माझ्याकडे दोनच पर्याय होते. एकतर राजीनाम देणं नाहीतर विकास करणाऱ्यांबरोबर जाणं आणि त्यासाठीच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं.

 

 

उदयनराजे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, मला नेहमी वाटायचं सगळं एकतर्फी कसं काय सुरू आहे. मग मी विचार केला का? त्यानंतर मी त्याची स्वतःपासून सुरूवात केली. जर या सरकारनं लोकांची कामं केली असतील तर लोकं काम करणाऱ्या लोकांनाचं मतदान करतील. ईव्हीएमच्या मुद्दा मला खटकत होता. त्यानंतर मला हे उत्तर मिळालं असल्याचं त्यांनी म्हटलं.

आज साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दुपारी दाखल झाली. त्यानंतर सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी या महाजनादेश यात्रेच्या सभेच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं आलं आणि शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्र्यांना तलवार भेट दिली तर उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पारंपारिक राजेशाही पगडी घातली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचंही पारंपारिक राजेशाही पगडी घालून स्वागत करण्यात आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...