[VIDEO] सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी, भीषण अपघात वाचला... 

पुणे
Updated Sep 16, 2019 | 16:00 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर-सांगली रस्त्यावरून जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रथावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकली. 

cm devendra fadanvis mahajanadesh yatra kadaknath chicken thrown in sangli news in marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेक  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सांगलीमध्ये महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेक 
  • महाजनादेश यात्रेचा रथाखाली येता येता भाजप कार्यकर्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते वाचले. 
  • भीषण अपघात होता होता वाचला. 
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर येत कडकनाथ कोंबड्या फेकल्या. 

सांगली :  मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर नगरमध्ये एका महिलेने शाई फेक करण्याचा प्रयत्न करण्याची घटना ताजी असताना आता सांगलीत या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकत निदर्शने करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आले होते. इस्लामपूर सांगली रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा ताफा जात असताना अचानक स्वाभिमानीच्या काही कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर येऊन कडकनाथ कोंबड्या फेकल्या.  हे आंदोलन स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आले. 

पश्चिम महाराष्ट्रात सध्या कडकनाथ घोटाळ्याचा विषय चर्चिला जात आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी यासाठी अनेक दिवसांपासून स्वाभिमानी पक्षाकडून आंदोलन झेडले आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार घेऊन ईडी कार्यालय गाठले होते. शेट्टी यांनी मुंबईच्या ईडी कार्यालयात जाऊन या संदर्भात एक तक्रारही दाखल केले होती. 

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेचा अंतीम टप्पा असून ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आपल्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा असताना आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात यावी यासाठी स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर कोंबड्या आणि अंडी फेकत निषेध व्यक्त केला. पण यावेळी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यातून बाजूला केला. या घटनेत काही क्षण मागेपुढे झाला असा तर शेतकरी संघटनेचा कार्यकर्ते किंवा भाजपच्या कार्यकर्त्याला महाजनादेश यात्रेच्या रथाची धडक बसली असती. 

हा व्हिडिओत इतक्या वेगात सर्व काही घटले की काही कळण्याचा आता कार्यकर्त्यांनी कोंबड्या फेकल्या आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी भाजप कार्यकर्ते धावले. या एक भीषण अपघात होता होता वाचला हेच म्हणावे लागेल. 


काय आहे कडकनाथ प्रकरण 

 कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून राज्यातील अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्यातील ६६ शहरातील पावणे दोन कोटी रुपयांचा लोकांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. च्या संस्थापक, संचालक, लेखापाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...