मोबाईल फोनचा नाद भोवला, केली तरूणाने आत्महत्या

पुणे
Updated Jul 19, 2019 | 19:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

मोबाईल फोनचा नाद हा कोणत्या थराला जाऊ शकतो याचे धक्कादायक उदाहरण हवेली तालुक्यातील पेरणेफाटा येथे पाहायला मिळाले. १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या करून घेतली. 

santosh dhanpal mali
संतोष धनपाल माळी  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • ऑनलाइन ब्लॅक पॅन्थर गेममुळे आत्महत्या केल्याचा संशय
  • आत्महत्येनंतर लिहिली चिठ्ठी, त्यात लिहिला को़डवर्ड
  • मोबाईल गेम खेळण्याचा नादात जीवन संपवले

हवेली :  मोबाईल फोनचा नाद हा कोणत्या थराला जाऊ शकतो याचे धक्कादायक उदाहरण हवेली तालुक्यातील पेरणेफाटा येथे पाहायला मिळाले. १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या करून घेतली.  गुरूवारी दिवाकर उर्फ संतोष धनपाल माळी या तरूणाने आत्महत्या केल्याचे उघड झाले. 

या तरूणाला मोबाईल गेमचे वेड होते. त्याचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई गृहिणी आहे. माळी कुटुंबिय मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे रहिवासी आहेत. संतोष हा पुण्याच जवळीत वाघोलीतील एका महाविद्यालयात कॉर्मस शाखेत सेंकड इअरला शिकत होता. त्याला मोबाईल फोनवर गेम खेळण्याचा नाद लागला होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला अनेकदा समजावले. परंतु, त्यांना त्यांचे तसेच नातेवाईकांचे ऐकले नाही. काही दिवसांपासून तो कॉलेजमध्येही गेला नाही, अशी माहिती समोर येत आहे. 

पोलिसांनी या संदर्भात माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार संतोषने गुरूवारी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तो राहत होता, त्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यावर काही मजकूर आढळून आला. तो काही कोडच्या स्वरूपात होता. तसेच त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली.  तसेच तो कोणता गेम खेळायचा याचाही तपास मोबाईलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.  तसेच असा कोणता गेम होता त्याचे त्याला व्यसन जडले होते, त्यामुळे त्याने आपले प्राण गमावले याचाही तपास पोलीस करत आहेत. 

संतोषच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते 'द एन्ड' 

आत्महत्या करण्यापूर्वी संतोषने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यावर म्हटले की ' अवर सन विल शाईन अगेन', 'पिंजऱ्यातील ब्लॅक पॅन्थर फ्री झाला' आता कसल्याच बंधनात राहिला नाही,  'द एन्ड' असा मजकूर लिहण्यात आला होता. तसेच एक कोडही या चिठ्ठीमध्ये लिहण्यात आला होता. त्याच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस आणि फेसबूक स्टेटसवर 'ब्लॅक पॅन्थर' या गेमचा फोटो लावण्यात आला आहे. 

पबजीमुळे मुलाचा मृत्यू 

सध्या मुलांपासून ते तरुणांपर्यंत साऱ्यांनाच पबजी गेमने वेड लावले आहे. या पबजीमुळे मुले वेड्यासारखी त्या मोबाईलला चिकटलेली असतात. जणू काही मुलांना गेमचे व्यसनच लागले आहे. या व्यसनामुळे एका १६ वर्षीय मुलाने आपला जीव गमावल्याची घटना गेल्या महिन्यात मध्य प्रदेशात घडली आहे. या गेमच्या व्यसनापायी मुलांचे हकनाक जीव जाऊ लागले आहेत. मुलांना मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाईलवर गेम खेळणेच अधिक आवडीचे वाटू लागले आहेत. तसेच सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने मुले सतत तासनंतास मोबाईलमध्ये गेमसाठी डोके खुपसून बसलेली दिसतात. 

मोबाईल फोनवर सलग ६ तास पजबी खेळणे आणि त्यात पराभव झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे वडील हारून कुरेशी यांनी १ जून रोजी सांगितले, त्यांचा मुलगा फुरकान २६ मेला रात्री दोन वाजेपर्यंत पबजी गेम खेळत होता. त्यानंतर २७ मेला सकाळी उठून तो सहा तास हा गेम खेळत होता. त्यानंतर ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असे तो ओरडू लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी