पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू

पुणे
Updated Sep 10, 2019 | 23:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Truck rammed vehicles in Pune: पुणे जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

pune accident three killled two injured
पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात अपघात
  • भरधाव ट्रकची इतर वाहनांना जोरदार धडक
  • अपघातात तिघांचा मृत्यू तर दोघे जखमी
  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

पुणे: एका भरधाव ट्रकने रस्तावरुन जाणाऱ्या इतर वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील लवले फाटा येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यात असलेल्या लवले फाटा येथे हा अपघात झाला आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघाताचा फोटो एएनआय न्यूज एजन्सीने ट्विट केला आहे. या फोटोत दिसत आहे की एक दुचाकी ट्रकच्या खाली अडकली आहे.

भरधाव ट्रकनं रस्त्यावरील इतर गाड्यांना आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण जखमी झाले आहेत. ट्रक चारकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर ट्रक चालकाला नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

जुलै महिन्यातही घडला होता भीषण अपघात

जुलै महिन्यात पुणे-सोलापूर मार्गावर रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात नऊ तरुणांना आपले प्राण गमवावे लागले होते. कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला होता. अपघातातील सर्व मृतक हे कॉलेजचे विद्यार्थी होते. हे सर्व विद्यार्थी पिकनिकसाठी रायगड येथे फिरायला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या गाडीला रात्रीच्या सुमारास अपघात झाला आणि नऊ जणांनी आपले प्राण गमावले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...