[VIDEO]: पुण्यातील केमिकल कंपनीला भीषण आग

पुणे
Updated Aug 15, 2019 | 00:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pune Fire: पुण्यातील एमआयडीसीमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

Pune fire
पुण्यात कंपनीला भीषण आग  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग
  • एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपनीला आग
  • अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
  • आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात असलेल्या कुरकुंभ येथील एमआयडीसीत एका कंपनीला भीषण आग लागली आहे. औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मधील एका केमिकल कंपनीला ही आग लागली आहे. पुणे-सोलापूर महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर ही केमिकल कंपनी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीला बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. केमिकल कंपनीत मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा आहे त्यामुळे आग आणखीनच भडकल्याचं बोललं जात आहे. केमिकल कंपनीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच घटनास्थली अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. 

केमिकल कंपनीला लागलेली ही आग इतकी भीषण आहे की आगीचे लोळ कित्येक किलोमीटर लांबून दिसत आहेत. केमिकल कंपनीत रसायनांचा साठा आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.

दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती अद्याप कळु शकलेली नाहीये. तसेच ज्यावेळी कंपनीला आग लागली तेव्हा कंपनीत कर्मचारी काम करत होते की नाही याची सुद्धा माहिती उपलब्ध झालेली नाहीये. कंपनीतील केमिकल साठ्यामुळे आग आणखीनच भडकत आहे. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत. आगीची तीव्रता पाहता आजुबाजुचा काही किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. या आगीमुळे दौंड एमआयडीसीत सर्वत्र धुराचे लोट दिसत आहेत. ही आग विझविण्यासाठी आणखीन वेळ लागणार असल्याचं दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
[VIDEO]: पुण्यातील केमिकल कंपनीला भीषण आग Description: Pune Fire: पुण्यातील एमआयडीसीमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...