पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

पुणे
Updated Jul 22, 2019 | 12:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pune IT staffer ends life: आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. पुण्यातील पिंपरी येथे हा प्रकार घडला आहे. या तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं आहे.

Suicide
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • आयटी कंपनीत काम करत होता सचिन
  • गोळी झाडून केली आत्महत्या
  • आत्महत्येच कारण अस्पष्ट

पुणे: आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने आपलं आयुष्य संपवल्याची घटना पुण्यात घडली आहे. मृत तरुणाचे नाव सचिन वांडेकर असं आहे. २८ वर्षीय सचिन वांडेकर याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. सचिन वांडेकर याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? आत्महत्या करण्याचं कारण काय? या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

सचिन वांडेकर हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथे राहणारा. कामानिमित्त तो पुण्यात आला होता. पुण्यातील विमान नगर येथे असलेल्या एका आयटी कंपनीत सचिन वांडेकर काम करत होता. सचिन आपला लहान भाऊ आणि मित्रासोबत पिंपळे गुरव येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वांडेकर याने काही दिवसांपूर्वी काम सोडलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून तो कामावर गेला नव्हता आणि आपल्या घरातच होता. रविवारी त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 

प्राथमिक माहितीनुसार, २८ वर्षीय सचिन वांडेकर हा कामानिमित्त पुण्यात रहाण्यासाठी आला होता. सचिन आपला लहान भाऊ दीपक आणि एका मित्राच्यासोबत पुण्यात राहत होता. काम सोडल्यामुळे सचिन हा घरीच होता. रविवारी संध्याकाळच्या सुमारास सचिनचा मित्र बाहेरून घरी आला आणि बाथरूममध्ये गेला तर सचिनचा भाऊ घरातून बाहेर पडला. त्याच दरम्यान अचानक गोळी झाडण्याचा आवाज आला त्यानंतर दीपक आणि सचिनचा मित्र घरात आले तेव्हा त्यांना सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

सचिनला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याचा मित्र आणि भाऊ दोघांनाही धक्का बसला. सचिनच्या छातीत गोळी लागली होती. गंभीर जखमी झालेल्या सचिनला त्याचा भाऊ आणि मित्र यांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात सचिनवर उपचार करण्यास सुरूवात झाली मात्र, त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण सचिनकडे पिस्तुल कुठुन आली तसेच त्याने आत्महत्या का केली? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीयेत.

महाराष्ट्रातील पुणे शहर हे एक आयटी हब बनलं आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात अनेक आयटी कंपन्या आहेत. या आयटी कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी राज्यातीलच नाही तर भारतातून आणि परदेशातील तरुणही येथे येतात. तशाच प्रकारे सचिन वांडेकर हा सुद्धा आयटी कंपनीत काम करण्यासाठी पुण्यात आला होता. मात्र, काही दिवस काम केल्यानंतर त्याने आपलं आयुष्य संपवलं. त्याने आत्महत्या वैयक्तिक कारणामुळे केली, कामाच्या त्रासामुळे केली की आणखीन काही कारणामुळे केली याचं उत्तर अद्याप मिळू शकलेलं नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या Description: Pune IT staffer ends life: आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. पुण्यातील पिंपरी येथे हा प्रकार घडला आहे. या तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...