शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचं निधन

पुणे
Updated Jul 20, 2019 | 22:29 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचं निधन झालं आहे. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मलाताई या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी आहेत. गेल्या वर्षांपासून त्या आजारी होत्या.

nirmala purandare
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचं निधन  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचं निधन
  • ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
  • निर्मलाताई या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी

पुणेः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचं निधन झालं आहे. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मलाताई या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी आहेत.  त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, मुलगी, सुना आणि नातवडं असा मोठा परिवार आहे. गेल्या वर्षांपासून त्या आजारी होत्या. निर्मलाताईंचा जन्म ८ जानेवारी १९३३ साली बडोद्यात झाला. गेल्या चाळीसहून अधिक वर्ष त्यांनी वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र आणि विद्यार्थी सहायक समितीमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी काम केलं.  पुरंदरे प्रकाशनाचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका आणि लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अकादमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या निर्मलाताई आई आहेत.  


ग्रामीण भागात असलेले विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी वनस्थळी या संस्थेची स्थापना केली. निर्मलाताई या संस्थेच्या संस्थापिका होत्या. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांच्या सबलीकरणासाठी काम केलं गेलं. त्यांच्या माध्यमातून राज्यात सुमारे २५० बालवाडी शाळांची निर्मिती झाली. ११ हजारांहून अधिक बालवाडी शिक्षकांना निर्मलाताईंच्या संस्थेनं घडवलं आहे. १९८१ ला त्यांनी वनस्थळी या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर महिलांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि त्यांच्या रोजगारासाठीच प्रशिक्षण देण्यासाठी काम सुरू केलं. या संस्थेच्या माध्यमातून निर्मलाताईंनी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी किशोर छंद वर्ग, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण, अशा प्रकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या विकासासाठी काम करत होत्या. 

nirmala purandare died

निर्मलाताई यांची VANASTHALI RURAL DEVELOPMENT CENTRE (VRDC) वनस्थळी संस्था १९७८-७९ मध्ये सुरू झाली. VRDC (वनस्थळी केंद्र) तालुका आधारीत मोबाइल प्रशिक्षण अभ्यासक्रमात ग्रामीण बालशिक्षण, आरोग्य, महिला कल्याण या विषयावर आधारीत मोबाइल प्रशिक्षण अभ्यासक्रमात खूप चांगला आकार येऊ लागला. वनस्थळी संस्थेमुळे शेकड्यानं महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या. आतापर्यंत १९७८ सालापासून अंदाजे १० हजारांहून अधिक ग्रामीण महिलांना सहामाही प्रशिक्षण उपक्रमात मदत मिळून त्या आता स्वावलंबी झाल्या आहेत. 

संस्थेतर्फे ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन मुलींना तसंच महिलांना शिवणकाम, साबण, मेणबत्ती, खाद्यपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. शिवणकला शिकलेल्या महिला गोधडी, फॉल पिको, पायपुसणी, दुपटी, कपडे, कापडी पिशव्या आणि पर्स तयार करतात. या महिलांनी शिवलेल्या गोधड्याना परदेशी पर्यटकांनी पसंती दिली आहे. पुणे शहरात या पिशव्यांना चांगली मागणी आहे. तसेच वनस्थळी या मासिकाची जवाबदारी इथल्या महिला आणि मुलींकडे आहे. 

एकीकडे सामाजिक काम सुरू असतानाच त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लेखन देखील केलं. स्नेहवर्णन त्यांचं हे प्रवासवर्णन पुस्तक प्रसिद्ध आहे. १९५७ साली निर्मलाताईंनी विद्यार्थी सहाय्यक समितीतून कामाला सुरूवात केली. पुरंदरे या प्रसिद्ध माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री.ग. माजगावकर यांच्या भगिनी होत्या. या साप्ताहिकाच्या संपादन विभागात त्यांनी २० वर्ष काम केलं होतं. 

फुलगावमध्ये निराश्रित बालकांसाठी बालसदनाची स्थापना देखील केली. खेडेगावातली ही पहिली बालवाडी निर्मलाताईंनी स्थापन केली. शाळाबाह्य तरूणांसाठी त्यांनी सुतारकाम, प्लम्बिंग सारख्या कामांच्या प्रशिक्षण वर्गांचं आयोजन देखील केलं. इन्वेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठी त्या अनेक उपक्रमाचे आयोजन करत असत. त्यांना २४ व्या पुण्यभूषण पुरस्कारानं सन्मामित केले गेले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. त्यासोबतच आदिशक्ती आणि सावित्रीबाई पुरस्कारानं देखील त्यांना गौरवण्यात आलं.

निर्मलाताईंनी सातवीपर्यंत बडोद्याला शिक्षण घेतले. त्यानंतर त्या साताऱ्यात आल्या. लग्नानंतर निर्मलाताईंनी दहावी आणि अकरावी पास केली. निर्मलाताईंचा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फान्स या भाषांवर चांगलं प्रभुत्त्व होतं. १९५७ पासून शिक्षण आणि कल्याण, सांस्कृतिक क्रियाकलाप - विद्यार्थी कल्याण परिषद यात संलग्न आहे. १९६७ पासून असोसिएशन ऑफ द फ्रेंड्स ऑफ फ्रान्स (A.F.F.) आणि १९७३ साली त्याच ग्रुपच्या अध्यक्षा झाल्या.  यासोबतच गेल्या वर्षी सहा महिन्याचे ग्रामीण महिलांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम शिरूर तालुक्यात सुरू केले. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेर यांच्या पत्नी असूवनही त्यांनी आपलं स्वतःच व्यक्तीमत्त्व त्यासोबतच लेखन शैली जोपासली. विद्यार्थी सहायक समितीसोबतच फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यमातूनही निर्मलाताईंचं मोलाचं योगदान होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचं निधन Description: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांचं निधन झालं आहे. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मलाताई या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी आहेत. गेल्या वर्षांपासून त्या आजारी होत्या.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...