उदयनराजे राष्ट्रवादीतच, पवारांशी या विषयांवर झाली चर्चा 

पुणे
Updated Sep 12, 2019 | 15:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ना भाजपमध्ये ना शिवसेनेत जाणार आहेत. या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

vidhansabha election 2019 udayanraje bhosale meet sharad pawar pune modi baugh dhananjay munde
उदयनराजे भोसले, धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शरद पवारांना पुण्यात भेटले उदयनराजे
  • भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम
  • पुण्यात आगामी विधानसभेची आखली रणनिती

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ना भाजपमध्ये ना शिवसेनेत जाणार आहेत. या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. उदयनराजेंच्या मुख्यमंत्र्यांची झालेल्या दोन गाठीभेटी, संभाजी भिडेंशी झालेली भेट यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात होते. पण उदयनराजे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपण कुठेही जाणार नाही, राष्ट्रवादीतच आहोत आणि इतर पक्षात जाण्याच्या चर्चांना पूर्वविराम दिला आहे. 

उदयनराजे यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली. यावेळी पुण्याच्या मोदी बाग येथे शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात सुमारे पाऊणे दोन तास बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. 

या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी आगामी विधानसभेत पक्षाची रणनिती काय असणार याबाबत चर्चा केली. प्रचाराचे मुद्दे काय असतील यावरही चर्चा करण्यात आली. उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज नाही आणि यापूर्वीही नव्हते. ते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, त्यांची कुठेही जाण्याची चर्चा झालेल नाही. त्यांनी कधीही भाजपमध्ये जाणार असल्याचे कधीही सांगितले नाही.  राज्यातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी त्यांनी भाजपच्या काही गटाकडून माध्यमांमध्ये ही चर्चा घडवून आणली.  

शिवस्वराज्य यात्रेत स्टार प्रचारकर असलेल्या उदयनराजेंनी त्याकडे पाठ फिरविल्यावर बोलताना मुंडे म्हणाले, शिवस्वराज्य यात्रेवेळी त्यांच्यावर इतर कामाचा व्याप होता. त्यामुळे ते या यात्रेसाठी ते वेळ देऊ शकले नाही. यात कोणतेही राजकारण नाही आणि उदयनराजे नाराज नसल्याचेही पुन्हा धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...