Pune Rape : पुण्यात १२ वर्षीय मुलीवर अत्याचार,चित्रा वाघांच्या ट्वीटनंतर काही मिनिटांत रुपाली चाकणकरांचे ट्वीट,म्हणाल्या...

12 year old girl raped in Pune : पीडित मुलीने तिच्याबरोबर घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने  थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

12 year old girl raped in Pune
चित्रा वाघांच्या ट्वीटनंतर काही मिनिटांत चाकणकरांचे ट्वीट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा बलात्कार
  • सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना
  • पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते

पुणे  : पुण्यात ८ एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना घडली आहे. बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा बलात्कार करण्यात आला आहे. सदर पिडीतेवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत पिडीतेवर बलात्कार झाला आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला आहे. सदर घटनेनंतर  पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ट्वीट करत महाराष्ट्रात अराजक माजले आहे… सत्ताधाऱ्यांची सगळी शक्ती विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी खर्ची पडतीये.. त्यामुळे समाजकंटकांचे फावले आहे. असं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांच्या ट्वीट नंतर काही मिनिटातच रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत सदर घटने प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास दिले आहेत. असं म्हटलं आहे.

अधिक वाचा : वजन कमी करायचंय? मग संध्याकाळनंतर या 3 गोष्टी नका खाऊ

पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते

दरम्यान, पीडित मुलीने तिच्याबरोबर घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने  थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी दुपारी पिडीता सार्वजनिक शौचालयात गेले असता आरोपी ही तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला. त्यानंतर आरोपीनं त्या मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते.

अधिक वाचा : अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर कंपनीचे शेअर्समध्ये तुफान तेजी

नेमकं काय आहे चित्रा वाघ यांचं ट्वीट?

पुण्यात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नराधम फरार झाला आहे… महाराष्ट्रात अराजक माजले आहे… सत्ताधाऱ्यांची सगळी शक्ती विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी खर्ची पडतीये.. त्यामुळे समाजकंटकांचे फावले आहे. असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

अधिक वाचा : रणबीर-आलियाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू 

रुपाली चाकणकर यांचे ट्वीट?

पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास दिले आहेत. असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी