Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर पत्नी जयश्री पाटील यांना कोर्टाकडून दिलासा 

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Apr 18, 2022 | 19:00 IST

शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी आणि सातार्‍याच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सातारा सत्र न्यायालायाने गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मुंबई सत्र न्यायालयाने सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना २९ मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. 

थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
  • जयश्री पाटील यांना २९ मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
  • शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात जयश्री पाटील या सहआरोपी आहेत.

Gunratna Sadavarte : सातारा : शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी आणि सातार्‍याच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल सातारा सत्र न्यायालायाने गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मुंबई सत्र न्यायालयाने सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना २९ मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. 

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली आहे. तसेच सदावर्ते यांनी सातार्‍याच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले होते. तेव्हा सातारा पोलिसांनी सदावर्तेंना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सदावर्ते यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. २९ मार्चपर्यंत पाटील यांना अटक करण्यात येऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात जयश्री पाटील या सहआरोपी आहेत.

मुंबईत शुक्रवार ८ एप्रिल २०२२ रोजी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्याबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी बंगल्याच्या दिशेने काही आंदोलकांनी चपला आणि दगड भिरकावले होते. या आंदोलनाला चिथावणी दिल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर होत आहे. सदावर्ते यांनी चिथावणी देणारे भाषण केल्यानंतर शरद पवार यांच्या बंगल्याच्या दिशेने चपला आणि दगड भिरकावून घोषणाबाजी करण्यात आली; असा आरोप होत आहे. याच प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली. 

पोलीस ठाण्यात बसवून दीड तास चौकशी करून नंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली. सदावर्ते यांनी अटक होण्याआधीच माझी हत्या होऊ शकते, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात माझ्या पत्नीने तक्रार दिली आहे. मला कोणतीही नोटीस न देता पोलिसांकडून बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले, असे सदावर्ते यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी