इंस्टाग्रामच्या स्टोरीमुळे घडली धक्कादायक घटना, हथोड्याने अकरावीतील विद्यार्थ्यांची हत्या

17 year boy shoot dead in pune - talegaon : सख्ख्या चुलत भावाने आपल्या मित्राच्या मदतीने तळेगावमधील आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात समोर आली आहे. दशांत परदेशी असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळं ही हत्या झाल्याची माहिती मिळाली

17 year boy shoot dead in pune - talegaon
इंस्टाग्रामच्या स्टोरीमुळे घडली धक्कादायक घटना,   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोलीस तपास करत असताना दोन्ही आरोपी सोबातच होते.
  • दाशांतने काही दिवसांपूर्वी फक्त ३०२ अशा आशयाचे स्टेटस ठेवले होते
  • दशांतला फोटो- व्हिडीओ काढून एडिटिंग करण्याचा छंद होता.

पुणे : सख्ख्या चुलत भावाने आपल्या मित्राच्या मदतीने तळेगावमधील आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात समोर आली आहे. दशांत परदेशी असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. इंस्टाग्रामच्या स्टेट्समुळं ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. लोखंडी हथोड्याने अकरावीतील विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली असून, तळेगावमध्ये सदर घटना घडली आहे.

दाशांतने काही दिवसांपूर्वी फक्त ३०२ अशा आशयाचे स्टेटस ठेवले होते

दरम्यान, घडलेली घटना अशी आहे की, दशांत नेहमी खुन्नस देत धमकावायचा, तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्रामच्या स्टेट्स वरती फक्त ३०२ अशा आशयाचे स्टेटस ही ठेवले होते. हे स्टेटस फक्त दोन्ही आरोपींनाच दिसत होते. त्यामुळे आरोपी चिडले आणि त्यांनी थेट दशांतवर प्राणघातक हल्ला केला. हल्ला करणारा आरोपी हा दशांतचा सख्खा चुलत मोठा भाऊ आहे त्याचे नाव कमलेश परदेशी (वय १९) असं आहे आणि मित्र प्रकाश लोहार (वय १९) हा आहे. आरोपींनी लोखंडी हथोड्याने आधी डोक्याच्या मागून आणि मग डोळ्यावर प्रहार केला. त्याचबरोबर बंदुकीची गोळी झाडून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत होतं.

दशांतला फोटो- व्हिडीओ काढून एडिटिंग करण्याचा छंद होता.

दशांतला फोटो आणि व्हिडीओ काढून एडिटिंग करण्याचा आणि ते इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा खूप छंद होता. आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी त्याने एक महागडा फोनही खरेदी केला होता आणि याचाच फायदा आरोपींनी घेतला. आरोपींनी फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा बहाणा करून केला आणि त्यानुसार प्रकाशने दशांतला फोन करून बोलावून घेतले. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही आरोपी दशांतला भेटले आणि तिथून एका बंद कंपनी समोर त्याला नेले. दशांत त्याच्या महागड्या फोनवर या दोघांचे फोटो घेत होता, त्यावेळी हथोडा काढून मागून एकाने दशांतच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर डोळ्यावर हल्ला केला. यात दशांत हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 

कॉल रेकॉर्डवरुन केला तपास

रात्री दशांत घरी पोहोचला नसल्याने दशांतचे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली मात्र, दशांत घरी पोहोचला नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता दशांतचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्याच्या मागून आणि डोळ्यातुन रक्तस्राव होत असल्याने अज्ञातांनी बंदुकीची गोळी झाडून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत होतं. यावेळी दशांतचा सख्खा चुलत मोठा भाऊ कमलेश आणि मित्र प्रकाश ही तिथं उपस्थित होते. आज सकाळी देखील पोलिसांसोबत ते घटनास्थळी आले होते. मात्र पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र हलवली, तेंव्हा शेवटचा फोन प्रकाशने केल्याचं दिसून आलं. मग पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेताच, त्यांचं बिंग फुटलं. दोघांनी हत्या केल्याची कबुली देताच पोलिसांसह कुटुंबियांना देखील धक्का बसला. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी