Crime News: चार वर्षे वडील, आजोबा, चुलत्याकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

17 year old girl was sexually assaulted by her family member in pune : पीडित मुलगी ही कुटुंबातील सदस्यांचीचं शिकार झाली आहे. तिच्या आजोबांनी देखील तिचं चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान 33 वर्षीय चुलत्याने जबरदस्ती करुन तिच्यावर किमान वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता.

17 year old girl was sexually assaulted by her family member in pune
चार वर्ष वडील, आजोबा, चुलत्याकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 17 वर्षीय मुलीवर चार चक्क चार कुटुंबातील सदस्यांनीच बलात्कार केला
  • वडील, चुलता आणि आजोबांनी केला 17 वर्षीय मुलीवर बलात्कार
  • आजोबांनी देखील पीडितेचं चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते

पुणे : 17 वर्षीय मुलीवर चार चक्क चार कुटुंबातील सदस्यांनीचं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. आजोबा, चुलता आणि वडिलांकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या तासाच्यावेळी ही घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून समुपदेशकांनाच धक्का बसला असून, या प्रकरणी 49 वर्षीय वडिलांना विश्रांतवाडी पोलिसांनी वडील, आजोबा आणि चुलत्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. 

अधिक वाचा ; आजचा शुक्रवार तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे राशीभविष्य

आजोबा पीडितेचं चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कुटुंबातील सदस्यांचीचं शिकार झाली आहे. तिच्या आजोबांनी देखील तिचं चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे करत होते. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान 33 वर्षीय चुलत्याने जबरदस्ती करुन तिच्यावर किमान वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. दरम्यान, यापेक्षा धक्कादायक म्हणजे आई काही कारणास्तव बाहेर गेली असता वडील तिच्यावर अत्याचार करायचे, असं पीडितेनं समुपदेशादरम्यान सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे आईवडील पुण्यात मोलमजूरी करतात. घरात परिस्थिती नीट नसल्याने लहानपणी तिला उत्तर प्रदेशातील गावाकडे रहायला पाठवलं होतं. 2016 ते 18 ही दोन वर्ष मुली उत्तर प्रदेशात रहायला होती. याच त्यानंतर त्यानंतर 2018 मध्ये ती मुलगी पुण्यात आली.

अधिक वाचा ; बुलडोझरच्या भीतीपोटी राणे पाडताय अधीश बंगल्याचं बांधकाम 

समुपदेशनाच्या वर्गातून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत

दरम्यान, यापूर्वीदेखील समुपदेशनाच्या वर्गातून असेच अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सात वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलीवर ओळखीच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले होते. समुपदेशनासाठी शाळेत गेलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित मुलीची चौकशी केली होती. त्यानंतर तिने तिसरीत असताना सात वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

अधिक वाचा ; बाळा नांदगावकरांचा संताप,"त्याचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करावा"

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी