खंडाळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पुणे
रोहन जुवेकर
Updated Nov 27, 2022 | 19:55 IST

2 Year Old Girl Drowned In Swimming Pool After Going To Lonavala Khandala For Tourism From Dombivli : पुणे जिल्ह्यातील खंडाळा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खंडाळ्यातील एका स्विमिंग पूलमध्ये बुडून 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

2 Year Old Girl Drowned In Swimming Pool
खंडाळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • खंडाळ्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
  • कार्निवल विला बंगल्याच्या गच्चीवर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये घडली घटना
  • पोलीस तपास सुरू

2 Year Old Girl Drowned In Swimming Pool After Going To Lonavala Khandala For Tourism From Dombivli : पुणे जिल्ह्यातील खंडाळा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खंडाळ्यातील एका स्विमिंग पूलमध्ये बुडून 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना खंडाळ्यातील प्रिछलीहिल परिसरातील कार्निवल विला बंगल्यात घडली. 

कार्निवल विला बंगल्याच्या गच्चीवर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून हानियाझैरा मोहम्मद नदीम सय्यद (वय : 1 वर्ष 11 महिने) हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिमुरडीचे वडील मोहम्मद नदीम कैसरहुसेन सय्यद (वय : 31, रा. : डोंबिवली, ठाणे जिल्हा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद नदीम कैसरहुसेन सय्यद, त्यांची पत्नी, 3 वर्षांचा मुलगा, मुलगी हानियाझैरा तसेच मोहम्मद यांची बहीण आणि तिचा पती हे सर्व जण शनिवार 26 नोव्हेंबर 2022 रोजी फिरायला म्हणून खंडाळ्यात आले. ते विला बंगल्यातील रूम भाड्याने वास्तव्यास होते. रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास सर्वजण नाश्ता करत होते आणि हानियाझैरा खेळता खेळता बंगल्यातील पायऱ्या चढून गच्चीवरील स्विमिंग पूलजवळ गेली आणि पाण्यात पडली. तिचा बुडून मृत्यू झाला. 

पाण्यात पडल्यानंतर हानियाझैरा हिने आरडाओरडा केला. अचानक बाहेरून ओरडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या आईवडिलांनी तसेच बंगल्यात उपस्थित असलेल्या इतर मंडळींनी स्विमिंग पुलाच्या दिशेने धाव घेतली. सगळ्यांनी हानियाझैरा पाण्यात पडल्याचे बघितले. त्यांनी हानियाझैराला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले‌. डॉक्टरांनी तपासणीअंती तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत. 

आम्हीच या परिसराचे भाई म्हणत केला गोळीबार, पुण्यात धक्कादायक घटना

Crime News प्रियकराच्या मदतीने तरुणीने मामाच्या मुलीची केली हत्या

कुठे आहे खंडाळा?

भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पश्चिम घाटात खंडाळा हे हिल स्टेशन आहे. पुणे जिल्यातील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणापासून साधारण ३ कि.मी.(१.९ मैल) आणि कर्जतपासून साधारण ७ कि.मी.(४.३ मैल) अंतरावर आहे. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीतील बोर घाट जेथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. उत्तर बाजूस खोल दरी आणि दक्षिण बाजूस सह्याद्री पर्वताचा उंच पहाड याच्या मध्यभागी खंडाळा गाव वसलेले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी