पुणे : हिंदुत्वाचा नवा अजेंडा आणि नवीव ध्वज घेऊन राज्यात परत एकदा फुंकार मारत असलेल्या राज ठाकरेंच्या मनसे (mns) पक्षासाठी वाईट बातमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी निवडणुकांच्या (elections) पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहे. यासाठी ते गवेगळ्या जिल्ह्याचे दौरे करत आहेत. परंतु या दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. पुण्यातील मनसे पक्षाला मोठं खिंडार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (400 mns party worker left party;even raj thackeray's tour)
अधिक वाचा : महाविकास आघाडीकडून महामोर्चाची हाक, 17 डिसेंबरला महामोर्चा
वसंत मोरे राष्ट्रवादी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी केली. त्यांनी माझिरेंनी मनसेचा राजीनामा दिला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांचे खंदे समर्थक मानले जाणाऱ्या माझिरेंनी तब्बल 400 कार्यकर्त्यांसह मनसेला 'जय महाराष्ट्र' केला. यामुळे पुण्यात मनसेच्या फुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर अजित पवार यांनी वसंत मोरे यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. अरे अजून किती दिवस नाराज राहणार. ये आम्ही तुझी वाट पाहतोय, असं अजित पवार म्हणाल्याचं वसंत मोरे म्हणाले. एका लग्नसोहळ्यात वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी Images
वसंतराव मला भेटायचं तुम्हाला, असंही अजित पवार मला म्हणाल्याच वसंत मोरे यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे पक्षात नाराज आहेत. या नाराजीमुळे ते पक्ष आणि राज ठाकरेंच्या दूर होऊ लागले आहेत. या नाराजी सत्रानंतर मोरे आता थेट विरोधी पक्षात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. वसंत मोरे यांच्या मते, पक्ष वाढविण्याच्या दृष्टीकोनातून कोणतेच प्रयत्न होत नाहीत. नाही काही कामे. नाराज झालेल्या लोकांच्या नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. याबाबत बोलताना मोरे म्हणाले की, पुण्यात मनसेत काही गटतट पडले. याची माहिती त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिली. पण, त्यावर कोणत्याही प्रकारची अक्शन घेतली गेली नसल्याचं वसंत मोरे म्हणाले.
अधिक वाचा : मुंबईत मालाडच्या मालवणी परिसरात 2 सशस्त्र गटांमध्ये राडा
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच निलेश माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी मनसे सोडण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता. निलेश माझिरे हे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याची चर्चा वारंवार डोकं वर काढत असते. याच पार्श्वभूमीवर निलेश माझिरे यांची आधी पदावरुन हकालपट्टी, आणि आता सोडचिठ्ठी या महत्त्वपूर्ण घटना आहे.
पक्षाच्या अंतर्गत वादामुळे वसंत मोरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील मनसेच्या कार्यक्रमात बोलू न दिल्यानं मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. मोरेंची नाराजी ही राज ठाकरेंच्या भोंगा आंदोलनापासून सुरू झाली आहे. वसंत मोरेंना स्थानिक पदाधिकारी डावलत आहेत, हे देखील वसंत मोरेंच्या नाराजीचं कारण आहे. पुण्यात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे वाद सध्या दिसून येत आहे.