पुणे : येरवडा (Yerwada jail) कारागृहातून महिनाभरात ४१८ कैद्यांची (prisoners) सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'रिलीज-अंडर-ट्रायल रिव्ह्यू कमिटी (UTRC) 75' म्हणजेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून या प्रकल्प देश्भारात राबवण्यात येत आहे. उच्च क्षमतेच्या आरोपी आणि कैदी असलेल्या तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती आहे. आणि याच प्रकल्पातून महिनाभरात तब्बल ४१८ कैद्यांची सुटका येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
अधिक वाचा ; मनपा निवडणुका एकत्र लढणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर
राज्यातील पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृह हे सर्वाधिक क्षमतेचे मोठे कारागृह आहे. या कारागृहात अनेक कैदी आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत. सध्या हे कारागृह खचाखच भरले आहे. कारागृहाची जेवढी क्षमता आहे. या क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी सध्या कारागृहात आहेत. दरम्यान, कैद्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवता येत नाही. विशेष म्हणजे तरुण कैद्यांचे दीर्घकाळ कारागृहात न राहता त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल, या दृष्टिकोनातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आणि याच प्रकल्पाअंतर्गत सध्या कैद्यांची सुटका केली जात असल्याचे दिसून येत आहे.
अधिक वाचा ; कोणत्या दिवशी कोणती वस्तू खरेदी करणं ठरेल शुभ आणि अशुभ
सध्या देशभरात सुरु असलेल्या या प्रकल्पात तब्बल १६ मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने फौजदारी दंड संहिता (CRPC) कलम ४३६ (जामीनपात्र गुन्हा) आणि ४३६ अ यांचा समावेश आहे. कारागृह अधीक्षक राणी भोसले आणि वरिष्ठ कारागृह अधिकारी पल्लवी कदम यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे.
अधिक वाचा ; या 1 रुपयाच्या शेअरने बनवले करोडपती, 1 लाखाचे झाले 7.32 कोटी
कैद्यांच्या सुटकेचे प्रमुख निकष ठरवले त्यात कैद्याचे वय १९ ते २१ दरम्यान आहे, ज्यांचा हा पहिला गुन्हा आहे, गुन्ह्यासाठी सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा आहे, एक चतुर्थांश शिक्षा तुरुंगात आहे. त्याचबरोबर कैद्याचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे यांसारख्या सूटसाठी एकूण १६ निकषांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालय आणि कारागृह प्रशासनासोबत बैठक घेऊन कैद्यांची सर्व माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर दर आठवड्याला बैठक घेऊन जास्तीत जास्त कैद्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.