Scholarship Examination Results : पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून MSCE Pune Scholarship Final Result 2021 7 जानेवारीला जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्यात 12 ऑगस्टला झालेल्या शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षेसाठी(Exam) 5वी आणि 8वीचे 6 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा अंतरिम निकाल 24 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर आता अंतिम निकालही जाहीर झाला आहे. विद्यार्थी हा निकाल mscepune.in, mscepuppss.in या अधिकृत वेबसाईट्स वर पाहू शकतील.
कोविड 19 च्या संकटात मागील वर्षी ही परीक्षा दोनदा लांबणीवर टाकत अखेर 12 ऑगस्टला पार पडली. निकालाच्या आकडेवारीनुसार, यंदा 24 हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत. एकूण परीक्षार्थ्यांच्या 14% विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत. विद्यार्थ्यांना नंतर शाळेतूनही निकाल पाहता येईल पण सध्या ऑनलाईन देखील निकाल पाहण्याची सोय केली आहे.
ऑनलाईन कसा पहाल Maharashtra Scholarship Result 2021?
यावर्षी 5वी च्या 14 हजार आणि 8वी च्या 10 हजार विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट मध्ये बाजी मारली आहे. त्यांच्या निकालाची प्रत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेशीच संपर्क साधावा लागणार आहे. 47612 शाळांमधून 6.32 लाख विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले होते. एकूण अर्जांपैकी 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला 388335 विद्यार्थी होते तर 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला 244143 विद्यार्थी होते.