ओमायक्रॉनची ग्रामीण भागात एंट्री , जुन्नरमध्ये ७ रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ

7 patients with omecron were found in Junnar : जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सातही जण २ आणि ३ डिसेंबरला यूएईमधून परतले होते.

7 patients with omecron were found in Junnar
ओमायक्रॉनची ग्रामीण भागात एंट्री , जुन्नरमध्ये ७ रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ
  • सातही जण २ आणि ३ डिसेंबरला यूएईमधून परतले होते.
  • राज्यात कालपर्यंत एकूण ६४,९५,९२९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

पुणे : देशात आणि राज्यात ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण रोज वाढत असल्याचं दिसून येत आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या १०९ वर पोहचली आहे. तर, राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या ४० वर पोहोचली आहे.  दरम्यान, आता ग्रामीण महाराष्ट्रात शिरकाव केला असून, चिंता वाढत असल्याचं दिसून येत आहे. जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सातही जण २ आणि ३ डिसेंबरला यूएईमधून परतले होते. ओमायक्रॉनबाधित सात जणांपैकी पाच जणांनी लशींचे दोन्ही डोस घेतले असताना देखील त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याने हा देखील चिंतेचा विषय आहे. बाधितांच्या संपर्कातील १५ जणांची तपासणी पूर्ण झाली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात ओमायक्रॉनने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यामधील २५ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

काल आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णापैकी सहा जणांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं

काल आढळलेल्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णापैकी सहा जणांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर दोन जण रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.  आज आढळलेल्या आठही रुग्णाचे लसीकरण झालं आहे. या सर्व रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे.  काल आढळलेल्या सर्व रुग्णाचे वय २९ ते ४५ यादरम्यान आहे. आठ रुग्णापैकी सात जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर एका रुग्णाला सौम्य लक्षणं आहेत. प्राथमिक माहितीनुसार आज आढळलेल्या पुणे येथील चार रुग्णांचा दुबई प्रवास, आणि दोन रुग्ण निकटसहवासित आहेत. मुंबई येथील एका रुग्णांचा अमेरिका प्रवास आणि कल्याण डोंबिवली येथील एका रुग्णांचा नायजेरिया प्रवास आहे. 

राज्यात कालपर्यंत एकूण ६४,९५,९२९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. तर , राज्यात काल ९०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झालाय. राज्यात कालपर्यंत एकूण ६४,९५,९२९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी