Kirtanakar Sanjay More Sucide Case मोठी बातमी ! कीर्तनकाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबदल पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरणं

a case has been registered against a police constable : आरोपी महादेव जाधव आणि त्याच्या एका साथीदाराने संजय मोरे यांनी आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ८ तारखेला संजय मोरे यांच्या घरी जाऊन एका महाराजांच्या मुलीला फोन का करतोस?, असे म्हणत संजय मोरे यांस मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली होती. असा आरोप संजय मोरे यांच्या बहिणीने केला आहे. त्यानंतर दोनच दिवसात संजय मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

a case has been registered against a police constable
कीर्तनकाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबदल पोलीसावर गुन्हा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कीर्तनकार संजय मोरे यांच्या आत्महत्येला एका पोलीस कॉन्स्टेबलसह एक व्यक्ती जबाबदार - आश्विनी मोरेंचा आरोप
  • आरोपी पोलीस कॉन्स्टेबलने संजय मोरे यांस मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली होती- बहिणीचा आरोप
  • आरोपी सतत फोन करून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता - अश्विनी मोरे

Indapur Crime News : इंदापूर येथील कीर्तनकार संजय मोरे यांनी केलेल्या आत्महत्येबाबत नवीन माहिती समोर आली आहे. कीर्तनकार संजय मोरे यांच्या आत्महत्येला एका पोलीस कॉन्स्टेबलसह (police)  एक व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप आहे. दरम्यानं, पोलीस  कॉन्स्टेबलसह त्याच्या अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय मोरे यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, संजय मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महादेव जाधव आणि त्याच्या एका अनोळखी मित्रावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजय मोरे यांनी १० सप्टेंबरला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मोरे यांच्या आत्महत्येनंतर इंदापूर शहरात मोठी खळबळ उडाली होती.

अधिक वाचा ; पितृपक्ष असल्याने मुलगी माहेरी आली आणि पुढे घडलं 'असं' काही

आरोपी पोलीस कॉन्स्टेबलने संजय मोरे यांस मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली होती- बहिणीचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव जाधव आणि त्याच्या एका साथीदाराने संजय मोरे यांनी आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ८ तारखेला संजय मोरे यांच्या घरी जाऊन एका महाराजांच्या मुलीला फोन का करतोस?, असे म्हणत संजय मोरे यांस मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली होती. असा आरोप संजय मोरे यांच्या बहिणीने केला आहे. त्यानंतर दोनच दिवसात संजय मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

अधिक वाचा ; नातीने घेतला आजीचा जीव, मोबाईलवरील लोन अ‍ॅप ठरलं कारण

आरोपी सतत फोन करून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता - अश्विनी मोरे

संजय मोरे यांची बहिण आश्विनी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हा सतत संजय मोरे यांना त्रास देत होता. वारंवार धमकी देणे, शिवीगाळ करुन मारहाण करणे, सतत फोन करणे अशाप्रकारे त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे संजय मोरे यांस आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने संजय मोरे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आश्विनी मोरे यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात देखील आरोपींनी संजय मोरे यांना इंदापूर शहरालगत असलेल्या देशपांडे व्हेजजवळ असलेल्या तापी बिल्डिंग या ठिकाणी नेऊन तू महाराजांच्या मुलीला फोन का करतो या कारणावरुन यांना मारहाण करण्यात आली होती, अशी माहिती आश्विनी मोरे यांनी दिली आहे. कीर्तनकार संजय मोरे यांचे डोके जिन्यावरती धरुन आपटून तसेच खाली पडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती, असं देखील आश्विनी मोरे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; Icc t-20 rankingमध्ये कोहली आणि वनिंदु हसरंगाची मोठी झेप 

या कलमांनुसार दाखल करण्यात आला गुन्हा

इंदापूर पोलिसांनी आरोपी पोलीस कॉन्स्टेबल महादेव जाधव याचा अहवाल पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे पाठवला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर, आरोपींविरोधात कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सदर घटनेचा कसून तपास करत आहेत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी