अखेर वादग्रस्त व्हिडीओ नंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, महिलेने केले गंभीर आरोप

A case has been registered against former BJP district president Srikant Deshmukh : श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

A case has been registered against former BJP district president Srikant Deshmukh
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
  • श्रीकांत देशमुख यांच्यावर पिडीत महिलेने केले गंभीर आरोप
  • श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला लग्नाचं वचन दिलं होतं

पुणे  भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत देशमुख यांचा ४ दिवसांपूर्वी एका महिलेसोबतचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओ नंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनाम चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपिवला होता. चंद्रकांत पाटील यांनी देखील देशमुख यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करून घेतला होता. दरम्यान, आता देशमुख यांच्यावर लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

अधिक वाचा : अमरावतीत भीषण अपघात..! दोन वाहनांच्या धडकेत 6 जण जागीच ठार

श्रीकांत देशमुख यांच्यावर पिडीत महिलेने केले गंभीर आरोप

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला लग्नाचं वचन दिलं होतं. तुळजापुरच्या मंदिरात लग्न करणार असं सांगितलं होतं. त्याचबरोबर, श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. मुंबई भाजप शहर युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी युवती सेल पदावर काम करत असताना देशमुख आणि माझी ओळख झाली होती असं देखील पिडीतेने म्हटलं आहे.

अधिक वाचा : भीषण अपघात; एसटी बस पुलावरून कोसळली, 13 जणांचा मृत्यू 

चित्रा वाघ यांनी घेतली होती घटनेची दखल

दरम्यान, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा चार दिवसांपूर्वी एक वादग्रस्त व्हिडिओ आणि ऑडीओ सोशल मीडियावरवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप देखील केला होता. त्यानंतर त्यांनी सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता. दरम्यान, या प्रकरणाची दखल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली होती.

अधिक वाचा : झेलेन्सकींचा SPYचीफ मित्र निघाला गद्दार, रशियाला केली मदत

ताईने तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी योग्य कारवाई होईलचं. - चित्रा वाघ

सदर घटनेनंतर चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करत म्हटलं होत की, यातील जी संबंधीत ताई आहे तिने तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी योग्य कारवाई होईलचं. प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ दखल घेत त्यांना पदावरून मुक्त केलेलं आहे', असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी