Crime News बापरे! बर्थ-डे पार्टीसाठी गेलेला तरुण घरी परतलाच नाही

A gang of 15 people brutally killed a young man ; प्रणव ज्ञानेश्वर मांडेकर (वय 19, रा. इंदोरी, ता.मावळ, जि. पुणे) असं आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून प्रणवची रविवारी रात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. मृताच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तळेगाव पोलीस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

A gang of 15 people brutally killed a young man
बापरे! बर्थ-डे पार्टीसाठी गेलेला तरुण घरी परतलाच नाही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 15 ते 20 जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत तरुणाची केली हत्या
  • तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला
  • प्रणव मांडेकर हा इंद्राणी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता

पुणे : राज्यात गुन्ह्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहेत. खून, महिलांवरील अत्याचार, चोरी, दरोडे यांसारख्या घटना वाढत चालल्या आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड परिसरात तर हे प्रमाण अधिक वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.  याचदरम्यान मावळ तालुक्यातील तळेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा 15 ते 20 जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने तळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा ; Virat Kohli:टी20 वर्ल्डकपदरम्यान विराट कोहलीसाठी मोठी खुशखबर

तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव ज्ञानेश्वर मांडेकर (वय 19, रा. इंदोरी, ता.मावळ, जि. पुणे) असं आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून प्रणवची रविवारी रात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात मृताचे वडील अनिल ज्ञानेश्वर मांडेकर (वय 42, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तळेगाव पोलीस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा ; रोहित शर्माच्या चाहत्याला मैदानात घुसणे पडले इतके भारी की... 

प्रणव मांडेकर हा इंद्राणी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता

प्रणव मांडेकर हा इंद्राणी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता, अशी महिती प्रणवच्या कुटुंबीयांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी प्रणवचा महाविद्यालयात काही मुलांसोबत त्याचे वाद झाले होते, या वादातूनच प्रणवची हत्या करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी मी वाढदिवसाच्या पार्टीला चाललो आहे असे सांगून प्रणवने घरी सांगितले आणि तो  घराबाहेर पडला. मित्रांसोबत गप्पा मारत असताना 15 ते 20 जणांच्या हातात कोयता असनाऱ्या टोळक्याने त्याच्या मित्रांचा आणि त्याचा पाठलाग केला. तेव्हा सर्वांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. मात्र, प्रणववर प्राणघात हल्ला केला आणि त्यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. तर या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला. दरम्यान, आरोपी तरुणांनी भररस्त्यावर प्रणवची हत्या केल्याने आरोपींना पोलिसांचा धाक राहिला आहे का? अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये सुरु आहे.

अधिक वाचा ; वेगळ्या ग्रहावरून आलाय हा खेळाडू, PAK क्रिकेटरने केली कमेंट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी